आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : का चिंतित आहे क्वीन कंगना?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधिका राव आणि विनय यांनी एक दशकापूर्वी सलमान खानसोबत एक चित्रपट बनवला होता आणि त्याची शूटिंग रशियामध्ये करण्यात आली होती. तांत्रिक गुणवत्ता असतानाही चित्रपट अपयशी ठरला. याच्या अनेक वर्षानंतर त्यांनी सनी देओल आणि कंगना रनोटसोबत एका रोमँटिक विनोदी चित्रपटाची शूटिंग अमेरिकेत केली. यामध्ये भूषणकुमार यांनी पैसा लावला, पण चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
अनेकदा बजेटपेक्षा जास्त खर्च झाल्यामुळेदेखील चित्रपट रखडतात आणि अनेकदा स्टार आपली बॉक्स ऑफिस चमक गमावतात. यामुळे त्याच्या चित्रपटांमध्ये अडथळे येतात. राजेश खन्ना यांनी पदार्पणातच एक चित्रपट केला होता आणि 'आराधना'नंतरच्या वादळामुळे त्यांना आपला हा 'कमकुवत' चित्रपट प्रदर्शित व्हावा, असे वाटत नव्हते. यशस्वी स्टारच्या भोवती एक फौज कशी काय उभी राहते, हेच कळत नाही. तसेच ते आपल्या मालकाच्या इशाऱ्यावर काहीही करण्यास तयार असतात. अनेकदा मंत्र्यांच्या कपाळावर आठ्या पडतात आणि अधिकाऱ्यांची फौज अत्याचाराचे वावटळ प्रसिद्ध करते. तथापि, राजेश खन्ना यांचा हा चित्रपट त्यांचे वादळ शमल्यानंतर प्रदर्शित झाला आणि या चित्रटाच्या यशाने त्यांच्या बुडत्या करिअरला काही काळासाठी आधार दिला.
तिग्मांशू धुलिया यांच्या 'पानसिंह तोमर'मध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या मालकांना तो आवडला नाही आणि त्यांनी तो प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. काही काळानंतर तिग्मांशू धुलिया, नायक इरफान खान आणि इतर लोकांनी आपल्या उर्वरित मानधनाचा त्याग केला, तेव्हा इच्छा नसतानाही चित्रपट प्रदर्शित झाला अत्यंत यशस्वी ठरला.
राधिका राव आणि विनय यांचा हा चित्रपट आता जुलैमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे. जणूकाही शांत असलेल्या एखाद्या ज्वालामुखीचा स्फोट होणार आहे. ज्या काळामध्ये कंगना 'क्वीन' नव्हती, त्या काळातील हा चित्रपट आहे. या संघर्षाच्या दिवसांमध्येच तिने या चित्रपटास सहज होकार दिला होता. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाचे प्रदर्शन आपल्या भरभराटीच्या काळात अंधार निर्माण करेल, असे कंगनाला वाटत आहे. मात्र, ती चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी कोणतेच प्रयत्न करताना दिसत नाही.
यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या भूषणकुमार यांचे म्हणणे आहे की, 'मी या चित्रपटाचे वितरण हक्क यापूर्वीच विकले होते. त्यामुळे हे प्रदर्शन रोखता येणार नाही.' हे शक्य आहे की, 'नियंत्रण गमावल्यानंतर'ही ते एखादा धागा ओढत असावेत आणि प्रदर्शनाची बाहुली त्यांच्या बोटांद्वारेच चालत असावी. तथापि, शो बिझनेसमध्ये चक्रामध्ये अनेक चक्र असतात आणि 'मशीन' कशी चालत आहे, हे कळतच नाही.
जर हा चित्रपट यशस्वी ठरला तर सनी देओल अभिनीत डॉ. द्विवेदी यांचा 'अस्सी घाट'ही प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ आपल्या मानधनाच्या उर्वरित रकमेसाठी अनेक संघटनांचे दरवाजे ठोठावत आहे. मात्र, कपाळ पाहून टिळा लावणाऱ्या संघटना शांत आहेत आणि कोर्ट सुरू आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये सत्ता बदलानंतर शांत बसलेल्या अनेक ज्वालामुखी पुन्हा उफाळून बाहेर यायला लागतात. विध्वंसक शक्ती पृष्ठभागाखाली वाहत राहते आणि काळाच्या नदीने वळण घेताच या शक्ती वर येतात. अशाच प्रकारे निर्मिती शक्तीही पृष्ठभागाखाली सदैव प्रवाहित राहते आणि एक व्यक्ती शंखनाद करतो तेव्हा निर्मिती शक्तीही पृष्ठभागाच्या वर येते. गांधीजी प्रकट होताच अनेक क्षेत्रातील निर्मिती शक्ती पृष्ठभागावर आल्या. संत गांधींच्या काळात तर वेश्यांनीही अपले कोठे बंद केले होते. महान क्रांतिकारी उधमसिंह यांना संकटाच्या काळात एका वेश्येने वाचवले होते आणि त्यांची भेट घेतल्यानंतर तिने आपला कोठा कायमचा बंद केला होता. अनेकदा अच्छे दिनांच्या काळात लोक दलाल होतात आणि नव्या पद्धतीचे वेश्यालयदेखील सुरू होते.
बातम्या आणखी आहेत...