आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : \'भाभीजी घर पर है\' सभ्य विनोदी मालिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून अँड टीव्हीवर 'भाभीजी घर पर है' ही विनोदी मालिका यशस्वीरीत्या प्रसारित केली जात आहे. यातील विनोदामध्ये अभद्रपणा आणि अश्लीलता नाही. तसेच ही कपिल शर्माच्या नारी अपमानावर आधारित मालिकादेखील नाही. यामध्ये लंपटपणाचे संकेतदेखील अत्यंत सूक्ष्म आहेत. ही वस्तुत: मध्यमवर्गीय मोहल्ल्यांच्या दैनंदिन आयुष्यात अनेक शतकांपासून प्रचलित असलेल्या 'भाभीवादा'वर आधारित मालिका आहे. या मोहल्ल्यांमध्ये अनेकदा लोकांचा दृष्टिकोन सहानुभूतिपूर्वक असतो. तसेच हे लोक मोठ्या चतुराईने 'पडोसी की बीबी बहोत सुंदर लगती है' आणि 'गरीब की जोरू सबकी भाभी' यासारख्या म्हणी आपल्या सुप्त मनाच्या खालच्या पातळीमध्येच दबलेल्याच राहू देतात.
लक्ष्मणाचा तो काळ आता राहिलेला नाही. अपहृत सीतेच्या गळ्यातील हार राम लक्ष्मणाला दाखवतो तेव्हा तो म्हणतो, 'मी तर सीतामातेचे फक्त चरण पाहिले आहेत. तो हार सीतामातेच्याच गळ्यातील असल्याचे तो कसे सांगणार?' गेल्या काही शतकांपासून तर 'पडोस की बीबी' आणि 'गरीब की जोरू'वाला दृष्टिकोनच या अन्यायग्रस्त समाजामध्ये सातत्याने प्रवाहित आहे. मध्यम वर्गात कामभावना गुप्तपणे नेहमीच प्रवाहित राहिल्या आहेत आणि आपल्या सुप्त मनाच्या सामायिक तंदूरमध्ये खालच्या पातळीवर मंद आचेप्रमाणे तेवत राहतात. हाच मोहल्ल्यांच्या भाभीवादाचा आधारभूत घटक आहे. पण आता तर पहिल्यासारखे मोहल्ले राहिलेले नाहीत. प्रत्येक घराच्या मध्ये अपरिचयाचे विंध्याचल उभे आहेत. जिथे काळाचा बर्फ अत्यंत मंदगतीने विरघळतो त्या छोट्या शहरांमध्ये आजही भाभीवाद आहे. खरे म्हणजे तो गुदगुल्यांप्रमाणे सुरक्षित आहे.
पुढे वाचा, कमालीची आहे कलाकारांची विनोदाची टायमिंग...
बातम्या आणखी आहेत...