Home | Parde Ke Pichhe | Parde Ke Peeche

पडद्यामागील: देशात पुरस्कारही उगवतात, वाचा मनोज कुमार यांच्या फिल्मी करिअरविषयी

जयप्रकाश चौकसे | Update - Mar 17, 2016, 04:45 PM IST

मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मनोज कुमार आणि धर्मेंद्र यांनी आपला प्रवास एकाच वेळी सुरू केला होता.

 • Parde Ke Peeche
  मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मनोज कुमार आणि धर्मेंद्र यांनी आपला प्रवास एकाच वेळी सुरू केला होता. सीताराम शर्मा या शिक्षकांमुळे मनोज कुमार यांच्या फिल्म करिअरमध्ये खूप बदल घडला. शर्मा यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करून पटकथा लिहिली होती. मनोज कुमार यांनी या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये त्यांना मदत केली. देशभक्तीच्या लाटेवर स्वार होऊनच आपल्याला वैतरणा पार करता येईल, हे मनोज कुमार यांना ‘शहीद’ नावाच्या चित्रपटामुळे कळाले. यामुळे त्यांना एक दिशा मिळाली.

  ‘शहीद’ला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले आणि प्रशंसाही झाली. याच चित्रपटाच्या प्रेरणेतून मनोज कुमार यांनी ‘उपकार’ची निर्मिती दिग्दर्शन केले. चित्रपट गीतकार गुलशन बावरा त्यांचे घनिष्ट मित्र होते. त्यांनी लिहिलेले ‘मेरे देश की धरती सोना उगले’या गीताने मनोज कुमार यांचा मार्ग प्रशस्त केला, परंतु आपल्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात त्यांनी गुलशन बावरा यांची साथ सोडली सीताराम शर्मांसाठी ‘यादगार’ नावाच्या चित्रपटामध्ये अभिनय केला. मात्र, तोपर्यंत मनोज कुमार यांना चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करण्याची सवय लागली होती. विचित्र बाब म्हणजे मनोज कुमार हे अभिनेते दिलीप कुमार यांना आपला आदर्श मानत होते. दिलीप कुमार यांच्याप्रमाणेच त्यांनादेखील आपल्या चित्रपटाच्या लेखनापासून ते संपादनापर्यंत प्रत्येक गोष्टीवर भरपूर नियंत्रण ठेवण्याचा छंद जडला. त्यामुळे ‘यादगार’च्या निर्मितीला उशिर झाला.
  मनोज यांच्या कोणत्या फॉर्म्युल्याने पैशांचा पाऊस पाडला, वाचा पुढील स्लाइडवर...

 • Parde Ke Peeche
  सोहनलाल कंवर यांच्या ‘संन्यासी’सह इतर चित्रपटांवरही मनोज कुमार यांचे नियंत्रण होते. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीचा फायदा हा असतो की, तुम्ही यशाचा मुकुट आपल्या डोक्यावर घालू शकता आणि चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी घेत नाही. तथापि, मनोज कुमार यांच्या ‘पूरब-पश्चिम’चा कॅन्व्हास खूप मोठा होता. याच्या शूटिंगसाठी लंडनवारी करण्यात आली होती. या चित्रपटाद्वारे मनोज कुमार यांनी चित्रपटांमध्ये देशभक्तीचे वलय वाढवून त्यात पूर्वेच्या संस्कृतीचे महिमागानही समाविष्ट केले. बॉक्स ऑफिसवर या फॉर्म्युल्याने पैशांचा पाऊस पाडला. याच फॉर्म्युल्यातून घोषणाबाजी हटवत आमिर खानने याच्या स्वरूपात बदल केला आणि त्यालादेखील यश मिळाले. ‘लगान’पूर्वी आणि ‘लगान’नंतरच्या आमिर खानमध्ये तुम्हाला फरक दिसेल. याच बदलाचा सुखद परिणाम म्हणजे छोट्या पडद्यावरील ‘सत्यमेव जयते’ ही मालिका होय. या अभिनव कार्यक्रमात अनेक सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. 
   
 • Parde Ke Peeche
  शेतात कीटक मारण्याच्या नावाखाली जी रासायनिक खते टाकली जात आहेत, त्या खतांचे भयावह परिणाम येण्यास सुरुवात झाली आहे. आपले अन्न-धान्य, फळे-भाज्या आपणच उगवले पाहिजेत, हे समजुतदार आणि साधन-संपन्न लोक जाणून आहेत. कारण बाजारातून खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये किती भेसळ आहे, याचा अंदाज लावणे कठीण आहे. आमची सरकारे जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणारी भेसळ रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु हे प्रयत्न पुरेसे नाहीत. आमच्या जेवणामध्ये विषाचे प्रमाण किती आहे, याचा आम्ही अंदाज लावू शकत नाही. विशेष म्हणजे हे विष खरेदी करण्याशिवाय सामान्य माणसाकडे कोणताच पर्याय नाही. आमच्या विकासाची ही स्थिती आहे की, आम्ही प्रत्येक माणसाचे बेटामध्ये रूपांतर करत आहोत. म्हणजेच जर शुद्ध माल पाहिजे असेल तर स्वत: त्याचे पीक घ्या. कोणतेही बेट लाटांपासून मुक्त होत नाही, हेदेखील आम्ही विसरत आहोत. 
   
 • Parde Ke Peeche
  आता शक्ती मिळवण्याच्या मार्गावर काही लोक असून ते लाटेला लाटेच्या विरोधात उभे करण्याच्या खेळामध्ये निष्णात आहेत. विचित्र बाब म्हणजे नकारात्मक शक्ती सहजपणे एकजूट होतात आणि सकारात्मक शक्ती कधीच सामाजिक मंचावर एकत्र येत नाहीत. आज प्रचाराची माध्यमे इतकी प्रभावी झाली आहेत की, नि:पक्ष वैज्ञानिक विचाराला दूर फेकले जात आहे. जहाजामध्ये वाळूचे पोते असतात आणि वादळ येण्यापूर्वीच ती जहाजातून फेकून दिली जातात. याला जेटसॅम म्हणतात. आपल्या समाजाच्या जहाजामध्ये जेटसॅमच्या नावावर वाळूच्या बदल्यात प्रवाशांनाच बाहेर फेकले जात आहे. 
   

Trending