Home | Parde Ke Pichhe | Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase

पडद्यामागील : सुट्यांमध्ये लॉस वेगासच्या कसिनोत जाऊन जुगार खेळतात रजनीकांत

जयप्रकाश चौकसे | Update - Jul 25, 2016, 11:42 AM IST

रजनीकांत अभिनीत 'कबाली'ची प्रिंट चोरवाटेने वेब दुनियेत पोहोचली. अधिकृतरीत्या बाजारात येण्याआधीच त्याचे गाणेही दाखल झाले आहे. या चोरीनंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी प्रेक्षकांचा महापूर उसळला. अनेक कर्मचाऱ्यांनी चित्रपट पाहण्यासाठी सुटीचा अर्ज दिल्याने अनेक कॉर्पोरेट कार्यालयांना या दिवशी सुटी देण्यात आली होती.

 • Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase
  रजनीकांत अभिनीत 'कबाली'ची प्रिंट चोरवाटेने वेब दुनियेत पोहोचली. अधिकृतरीत्या बाजारात येण्याआधीच त्याचे गाणेही दाखल झाले आहे. या चोरीनंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी प्रेक्षकांचा महापूर उसळला. अनेक कर्मचाऱ्यांनी चित्रपट पाहण्यासाठी सुटीचा अर्ज दिल्याने अनेक कॉर्पोरेट कार्यालयांना या दिवशी सुटी देण्यात आली होती. बँकेचेही अनेक कर्मचारी सुटीवर होते. मुळात दर्शकांचा हा उत्साहच चित्रपटाच्या यशाचा मापदंड असतो. प्रेक्षकांच्या उन्मादाला समजणे कठीण आहे. कोणत्याही प्रयोगशाळेत याचे विश्लेषण शक्य नाही. रिचर्ड बर्टन नावाच्या लेखकाने 'अॅनाटॉमी ऑफ हीरो'मध्ये या प्रकाराबाबत चांगले लिहिले असून, अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, प्रसिद्ध चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख...

  (Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase
  भारतात नायकाला पूजण्याची प्रथा अवतारवादाने आली आहे. याला अनेकदा पलायनवादही म्हटले जाते. सीमेवर असणारा सैनिक जेव्हा खंदकात जातो तेव्हा त्याला आपल्या घरच्या माणसांची आठवण येते मग तेव्हा त्याला तुम्ही पलायनवाद म्हणणार का? मनुष्याचे अवचेतन मान सरोवरासारखे आहे. ज्याचे पाणी विविध पहाडांवरून येऊन विविध रंगांचे दिसते. पाण्याचा रंग एकच असतो; मात्र हे विविध रंग फक्त आभास उत्पन्न करतात. कारण पाणी हे राजकीय नेत्यांसारखे सरड्याप्रमाणे रंग बदलत नाही. रजनीकांत नावाच्या कलाकाराच्या लोकप्रियतेचे गूढ अनाकलनीय आहे.
 • Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase
  दक्षिण भारतात त्याची देवाप्रमाणे पूजा केली जाते. मुळात तो मूळचा महाराष्ट्रीय आहे. शिवाजी त्याचे नाव. तो कधीकाळी बंगळुरूला बस कंडक्टर म्हणून काम करत होता. सर्कशीतल्या जादूगारासारखे काम तो कधीकाळी करत होता. सिगारेटला हवेत फेकून तोंडाने पकडणे, टोपीला हवेत फेकून ती बरोबर डोक्यावर झेलणे आदी कामांत तो तरबेज होता.
 • Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase
  सध्या तो स्टार आहे. आपल्या कमाईतला मोठा हिस्सा तो गरिबांना वाटून देतो म्हणून तो लोकप्रिय आहे का? नाही कारण अनेक धनवान लोक हे दानशूर असतात; मग ते कुठे एवढे लोकप्रिय असतात.
 • Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase
  अभिनय आणि कलेच्या मापदंडावर त्याचे काहीच वजन नाही. तो अत्यंत साधारण अभिनेता आहे. त्याचे रंग, रूप आणि व्यक्तिमत्त्वही खूप आकर्षक नाही. तो जिममध्ये जाऊन व्यायाम केलेला पीळदार शरीरयष्टीचा नटही नाही.
 • Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase
  अत्यंत साधा माणूस असूनही त्याच्या एवढ्या लोकप्रियतेचे गमक काय? कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाताना तो कोणताच मेकअप करत नाही. आपल्या टकलालाही तो झाकत नाही, तरीही तो एवढा लोकप्रिय कसा आहे, हे कोडेच आहे.
 • Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase
  दरवर्षी तो सुट्यांमध्ये विदेशात जातो. त्याच्याबरोबर इतर नटांप्रमाणे सेवकांचा ताफा नसतो. एका छोट्या पिशवीमध्ये दोन जीन्स आणि टी-शर्ट एवढेच सामान त्याच्याबरोबर असते.
 • Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase
  विमान किंवा एखादी आलिशान गाडीही त्याला लागत नाही. रस्त्याने एखाद्या वाहनाला हात करून त्याचा प्रवास सुरू असतो.
 • Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase
  सुट्यांमध्ये लॉस वेगासच्या कसिनोत जाऊन तो खूप जुगारही खेळतो. हा नशीबवान माणूस तेथेही जिंकतोच. फक्त रोमांच आणि अनिश्चिततेच्या खेळाची आवड म्हणून तो तेथे जातो. आपल्या जीवनाप्रमाणेच जुगारही अनिश्चिततेचाच खेळ आहे आणि तो त्याला आवडतो.
 • Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase
  तसे पाहिले तर चीनचा सामान्य माणूस हा अट्टल जुगारी मानला जात होता. सध्या राजेशाही आल्याने कदाचित ते शक्य नसेल. चीनमधील मानसिकतेचा मंत्र्यांनी विचार करायला हवा; आपले सध्याचे नेते मात्र पाकिस्तानला आपला सर्वात मोठा शत्रू समजून त्याविरोधात पावले उचलत आहेत. कारण पाकिस्तानचा विरोध हे समीकरणच मतपेटीत भरभरून दिसणारे समीकरण आहे.
 • Parde Ke Peeche By Jaiprakash Choukase
  विशेष म्हणजे, हे दोन्हीही देश एकाच मांसाचे आहेत. हे सांगायचे तात्पर्य असे आहे की, जे करायचे ते होत नाही आणि जे नकोय तेच होत आहे. हा निसर्गाचा करिश्मा समजायचा का? कारण रजनीकांतही निसर्गाचा एक करिश्माच आहे.

Trending