Home | Parde Ke Pichhe | Parde Ke Peeche: Read About Shri Devi's Mom Film

पडद्यामागील: श्रीदेवीच्या निमित्ताने 'शोले' आणि 'सेव्हन सामुराई'ची आठवण

जयप्रकाश चौकसे | Update - Mar 17, 2016, 04:15 PM IST

पत्नी श्रीदेवी यांना मध्यवर्ती भूमिका देऊन बोनी कपूर ‘मॉम’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. माणसांप्रमाणे पटकथांचीही कुंडली असते.

 • Parde Ke Peeche: Read About Shri Devi's Mom Film
  पत्नी श्रीदेवी यांना मध्यवर्ती भूमिका देऊन बोनी कपूर ‘मॉम’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. माणसांप्रमाणे पटकथांचीही कुंडली असते. एक दशकापूर्वी ‘मॉम’ची पटकथा लिहिण्यात आली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काही चित्रपट बनवले. त्यांची पत्नी गौरी शिंदे यांनी श्रीदेवी अभिनीत ‘इंग्लिश विंग्लिश’चे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट जगातील अनेक देशांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शित करण्यात आला होता. जपानमध्ये या चित्रपटाने भव्य व्यावसायिक यशही मिळवले होते.
  पुढे वाचा, ‘शोले’चा मूळ विचार कुठून घेण्यात आला....

 • Parde Ke Peeche: Read About Shri Devi's Mom Film
  जपानमध्ये अनेक जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक होऊन गेले आहेत. अकिरा कुरोसाव्हा यांच्या ‘सेव्हन सामुराई’पासून प्रेरित चित्रपट अनेक देशांमध्ये बनले. भारतीय ‘शोले’चा मूळ विचारही ‘सेव्हन सामुराई’मधूनच घेण्यात आला आहे, परंतु कोणत्याही चित्रपटामध्ये ‘सेव्हन सामुराई’चा मूळ संदेश सादर झालेला नाही. यातील ‘गाव’ संस्कृतीचे प्रतीक आहे आणि ‘डाकू’ क्रूरतेचे प्रतीक आहेत. अशीच या चित्रपटाची वीण आहे. जेव्हा क्रूरतेचे संस्कृतीवर आक्रमण होते, तेव्हा संस्कृती आपल्या रक्षणासाठी कायद्याच्या मर्जीवर उभ्या असलेल्या अपराध्यांना आमंत्रित करते. जणूकाही असंस्कृतीशी युद्ध करणे ‘संस्कृती’च्या आवाक्यात नाही आणि आपल्या सुरक्षेसाठी तिला ‘असंस्कृती’चीच मनधरणी करावी लागते. सभ्य होण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही कमकुवत होतो का, असे तर अकिरा कुरोसाव्हा यांना म्हणायचे नव्हते ना? 
   
  पुढे वाचा, शोलेमध्ये हेमा मालिनीने धर्मेंद्र यांना दुर्लक्षित केले असते तर सिनेमा फ्लॉप झाला असता...
 • Parde Ke Peeche: Read About Shri Devi's Mom Film
  अकिरा कुरोसाव्हा यांच्या चित्रपटामध्ये सामुराई आपले काम पूर्ण करून परतत असताना त्यातील एका सामुराईची प्रेयसी त्याला सोडून आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी निघून जाते, हे अधोरेखित झाले आहे. संपूर्ण क्लायमॅक्समध्ये पाऊस पडत असल्याचे आणि पीक पेरणीचा हंगाम असल्याचे दाखवले आहे. संरक्षण झाल्यावर संस्कृती पुन्हा आपल्या स्वार्थाकडे परतते, हा ‘संस्कृती’चा वाईटपणा यातून सादर केला आहे. हे स्पष्ट आहे की, कोतेपणा आणि स्वार्थ हे मानवी स्वभावामध्ये इतके ठासून भरलेले आहेत की ते काही केल्या जातच नाहीत. हे तत्त्वज्ञान केवळ ‘सेव्हन सामुराई’मध्ये आहे. आपल्या ‘शोले’ किंवा ‘मेरा गाव मेरा देश’मध्ये ही खोली नाही. मात्र, हेच कटू सत्य अधोरेखित करण्याचा अकिरा कुरोसाव्हा यांचा उद्देश होता. आता जर रमेश सिप्पी यांनी ‘शोले’मध्ये हेमामालिनी यांना क्लायमॅक्समध्ये धर्मेंद्र यांच्याकडे दुर्लक्ष करताना दाखवले असते, तर चित्रपट अपयशी ठरला असता. 
   
  पुढे वाचा, शोलेमधील रेल्वे दरोड्याचे दृश्य कुणी रचले...
 • Parde Ke Peeche: Read About Shri Devi's Mom Film
  एखाद्या सामाजिक दस्ताऐवजाप्रमाणे चित्रपटाची निर्मिती करावी, अशी रमेश सिप्पी यांची इच्छा नव्हती. केवळ यश मिळवणे, हा त्यांचा उद्देश होता आणि ते त्यांना मिळालेदेखील. बॉक्स ऑफिसवर ‘शोले’ला एवढे मोठे यश मिळाले की तुम्ही व्यावसायिक सिनेमाची ‘शोले’पूर्वीच्या आणि ‘शोले’नंतरच्या दोन खंडांमध्येदेखील विभागणी करू शकता. हे अनेक पातळ्यांवर शक्य आहे. ‘शोले’तील अॅक्शन दृश्यांसाठी रमेश सिप्पी यांनी हॉलीवूडच्या तज्ज्ञांना पाचारण केले होते. ‘शोले’तील रेल्वे दरोड्याचे दृश्य विदेशी तज्ज्ञांनी रचले आहे. हॉलीवूड सिनेमामध्ये रेल्वे दरोडा हा प्रकार सिनेमा प्रकाराएवढाच जुना आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘शोले’तील रेल्वे दरोड्याच्या दृश्यापेक्षा अधिक प्रभावी दृश्य दिलीप कुमार यांच्या ‘गंगा जमुना’त होते. त्यासाठी कोणत्या
   
  पुढे वाचा, भारतीय सिनेमावर प्रारंभिक काळापासूनच अमेरिकन सिनेमाचा प्रभाव...
 • Parde Ke Peeche: Read About Shri Devi's Mom Film
  दिलीप कुमार आणि त्यांचे कॅमेरामन व्ही. बाबासाहेब यांच्या कौशल्यामुळेच हे दृश्य प्रभावी ठरले होते. अशाच 
  प्रकारे ‘मुघल-ए-आझम’मधील काचेच्या महालाचा सेट कॅमेरामन आर. डी. माथूर यांनी इतक्या कुशलतेने चित्रित केला होता की विदेशींनीही त्यांच्या कौशल्याची प्रशंसा केली होती. एक निष्णात तंत्रज्ञ कौशल्याच्या जोरावर इतिहास रचतो. भारतीय सिनेमावर त्याच्या प्रारंभिक काळापासूनच अमेरिकन सिनेमाचा प्रभाव राहिला आहे. अमेरिकेऐवजी जपानी सिनेमाशी जोडणे भारतातील दिग्दर्शकांसाठी फायद्याचे ठरले असते. वस्तुत: आपल्याकडे सिनेमा प्रकाराचा उदय इंग्रजांच्या काळात झाला. त्यामुळे भारतीय सिनेमा पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी गेला आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे जपान आणि चीनची संस्कृतीही जुनी आहे; परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्रभावामुळे आपण स्वत:ला पश्चिमेच्या जवळचे समजतो. सिनेमा तंत्रज्ञानासोबतच आला आहे. तंत्रज्ञान एकटे कधीच येत नाही. 
   

Trending