आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : शत्रुघ्न सिन्हा यांचे आत्मचरित्र आणि बिग बींसोबतचा \'दोस्ताना\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
अनुभवी पत्रकार भारती प्रधान यांनी सुमारे सात वर्षांपर्यंत विविध शहरांमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांशी चर्चा करून शत्रुघ्न सिन्हा यांच्या जीवन, प्रेम आणि करिअरवर ‘एनिथिंग बट खामोश’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. शत्रुघ्न एका चित्रपटात आपल्या भारदस्त आवाजामध्ये ‘खामोश’ म्हणाले होते. तेव्हापासून ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जनतेच्या आग्रहाखातर ‘खामोश’ हा डायलॉग म्हणतात. सिनेस्टार काही प्रमाणात आपल्या प्रयत्नातून आणि काही प्रमाणात चाहत्यांच्या सहकार्याने स्वत:ची प्रतिमा तयार करतो. यालाच आपण मानवाचे खरे रूप मानतो.
 
शत्रुघ्नसारख्या बडबड्या व्यक्तीच्या प्रतिमेसोबत ‘खामोश’ शब्द कसा काय जोडला गेला, हे कुणालाही कळालेले नाही. तथापि, हा शब्द अमिताभ बच्चन यांचे व्यक्तिमत्त्व उत्तमरीत्या अभिव्यक्त करतो. हादेखील योगायोग म्हणावा लागेल की, आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात एकमेकांचे घनिष्ठ मित्र राहिलेल्या शत्रुघ्न आणि अमिताभ यांच्यात नंतर कटुता आली. त्यांनी यश जोहर यांचा पहिला चित्रपट ‘दोस्ताना’मध्ये सोबत काम केले होते. याची पटकथा सलीम-जावेद यांनी लिहिली होती. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, शत्रुघ्न आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीविषयी...