आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील : दोन HIT नायिकांची दमदार एंट्री, वाचा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजोल आणि ऐश्वर्या राय आज वयाच्या ज्या वळणावर उभ्या आहेत, तेथून उतार दूर नाही. तरीदेखील त्यांच्याबद्दल काहीच लिहिले जात नाही. कथा-चित्रपटाच्या सुरुवातीलाच वेश्यांपर्यंत सर्वांनीच नायिकेची भूमिका करण्यास नकार दिला तेव्हा सोळंके नावाच्या सुंदर पुरुषाने नायिकेची भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच कमी अधिक प्रमाणात महिला पात्रे पुरुष दृष्टिकोनातूनच रचली जात आहेत. त्याला कंगना रनोटचा ‘क्वीन’, ‘रिव्हॉल्व्हर रानी’ विद्या बालनचा ‘कहानी’ आणि ‘एनएच १०’ इत्यादी अपवाद आहेत.
या परंपरेची सुरुवात शांताराम यांच्या ‘दुनिया ना माने’पासून झाली होती आणि नंतर विजय आनंद यांच्या वहिदा रेहमान अभिनीत ‘गाइड’चादेखील समावेश आहे. या यादीत माझी आवडती अभिनेत्री अरुणाराजे यांचा ‘रिहाई’ आहे. हेदेखील खरे आहे की, फक्त नर्गिस आणि मीनाकुमारी यांना नायकाच्या बरोबरीने मानधन मिळाले आहे.
मात्र, गेल्या २० वर्षांमध्ये काजोल आणि ऐश्वर्याच्या मानधनात बरीच तफावत दिसून येते. एवढेच नाही तर यशस्वी दीपिका
पदुकोणदेखील साडेसात कोटी रुपये मानधन घेते, तर नायक ५० कोटींपेक्षा जास्त मानधन किंवा चित्रपटाच्या नफ्यातील ४० टक्के घेतो.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, ऐश्वर्या आणि काजोलविषयी बरेच काही...