आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इन्सपेक्टर' काजोल छोट्या पडद्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेनमार्कची लोकप्रिय मालिका अमेरिकेत 'किलिंग' नावाने बनवण्यात आली. तथापि, मूळ भाषेत याचा अर्थ 'अपराध' असा होतो. आता याच पटकथेची हिंदीत टीव्हीसाठी काजोलच्या मध्यवर्ती पात्रासह निर्मिती करण्याची तयारी सुरू आहे. काजोलला 'किलिंग' रंजक वाटली आहे. याच्या भारतीय आवृत्तीत हे पात्र महिला गुप्तहेराऐवजी महिला इन्स्पेक्टरचे असेल. 'ईश्वर'मध्ये नायिकेची भूमिका साकारणार्‍या दक्षिण भारतातील सुपरस्टारने महिला पोलिस इन्स्पेक्टरच्या रूपात यशस्वी चित्रपटांची साखळी निर्माण केली होती. तिचे नाव विजयाशांती आहे. तिने अभिनय केलेल्या 'तेजस्विनी'च्या मूळ तामिळ आणि तेलगू आवृत्तीच्या भव्य यशानंतर आंध्र आणि तामिळनाडूत अनेक तरुण मुली पोलिस दलात भरती झाल्या होत्या. सिनेमाद्वारे अशा प्रकारेदेखील सामाजिक परिवर्तन होऊ शकते. भारतीय पोलिस दलात महिलांची संख्या नेहमीच कमी राहिली. कारण काही नोकर्‍या पुरुषांसाठीच योग्य असल्याची धारणा लोकप्रिय आहे. भारतात शिकलेल्या लोकांची स्थिती वाइट आहे. एकदा विमान प्रवासात वैमानिक महिला असल्याची घोषणा झाल्यानंतर माझ्या शेजारच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने त्या विमानातून उतरण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, ऐन उड्डाणाच्या वेळी हे शक्य नव्हते. आकाशात उड्डाण भरण्यापूर्वी वैमानिकाच्या नावाच्या घोषणा करण्याची परंपरा आहे. जेव्हा आम्ही इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचलो तेव्हा माझ्या सहप्रवाशाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
सर्वच राज्यातील पोलिस दलात महिलांची संख्या फार कमी आहे. तसेच वर्धा येथील गांधी विद्यापीठाचे कुलगुरू रॉय यांनी केलेल्या संशोधनानुसार, मुस्लिमांची संख्यादेखील खूप कमी आहे. वैचारिक संकुचितपणा अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने अभिव्यक्त होतो. असो, मालिकेत काम करणारी काजोल पहिली सुपरस्टार असेल. काजोल प्रतिभावंत आहे. तिचे छोट्या पडद्यावरील आगमन प्रेक्षकांना सध्याच्या टीव्हीवरील महिलांच्या ओवरअँक्टिंगपासून कदाचित मुक्ती मिळवून देईल.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...