आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटकसरी अक्षय आणि महागडे मुरुगदास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा पाच वर्षांचा नातू मंत्र म्हणतो की, 'दोन महिन्यांच्या सांगूनही फक्त 49 दिवसांच्याच सुट्या मिळाल्या आहेत.' सुट्यांची प्रतीक्षा आणि त्यासाठी असलेली आतुरता, हा मनुष्याचा स्वभाव आहे. सुट्यांमुळे रोजच्या ठरलेल्या कामांपासून मिळणारी सुटका आणि सुट्यांमध्ये संचित केलेली ऊर्जा, दोन्हींमुळे काम करण्यासाठी आणखी ताजेपणा येतो. काही सुविधासंपन्न लोकांचे जीवन एका सुटीनंतर दुसर्‍या सुटीत चालले जाते. त्यांना सुट्याच थकवतात. अनेक दशकांपूर्वी ए. जी. गार्डनर यांनी सुट्यांच्या बाबतीत लिहिले होते. सुट्या किती थकवतात आणि खरा आराम तर घरी आल्यानंतरच मिळतो, यावर त्यांनी प्रकाश टाकला होता. सुट्यांमध्ये पर्यटनासाठी काही ठिकाणचे लोक उर्वरित वर्षासाठी आधीच पैसा जमा करतात. सुट्यांमध्ये प्रवासांचे पॅकेज विकणे चांगला व्यवसाय आहे.
करमणूक उद्योगाला सुट्यांमध्येच भरपूर पैसा कमावण्याची संधी मिळते आणि दरवर्षी मे ते ऑगस्टपर्यंतचा काळ शुभ मानला जातो. नंतर दिवाळी ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतच्या काळातही 25 टक्के व्यवसाय वाढतो. या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये निवडणूक आणि आयपीएलमुळे करमणूक उद्योगात मंदीचा काळ राहिला, परंतु योगायोग म्हणजे आता 'हॉलीडे' नामक चित्रपट उरलेल्या सुट्यांचा फायदा करून घेण्यासाठी प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा अभिनीत 'हॉलीडे'चे दिग्दर्शक मुरुगदास असून त्यांनीच 'गझनी'चे दिग्दर्शन केले होते. दक्षिण भारतात मुरुगदास एक 'ब्रँड' असून त्यांच्या केवळ नावावरच तिकिटांची विक्री होते. त्यांची चित्रपट दिग्दर्शकांमध्ये रजनीकांतसारखी योग्यता आहे. एका माशीला मध्यवर्ती पात्र बनवून त्यांचा तामिळ चित्रपट हीट ठरला, यावरूनच हे स्पष्ट होते. कारण त्यांचा स्वत:चा प्रेक्षकवर्ग आहे, पण याच चित्रपटाची हिंदी आवृत्ती सपशेल आपटली.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...