आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : लंपट पतींचा बचाव बायका का करतात?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी टीव्हीच्या जिंदगी चॅनलवर एक कथा दाखवण्यात आली. त्यात एका श्रीमंत माणसाच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरीला जातो. नेहमीच सावध राहणारा मालक ज्याच्यावर त्याला संशय आहे, त्या युवा कर्मचाऱ्यांच्या घरी जातो आणि त्याला लॅपटॉप सापडतो. मात्र, त्या तरुणाची सुंदर विधवा आई त्यांना विनंती करते की, माझ्या मुलाला भलेही नोकरीवरून काढा, पण त्याला जेलमध्ये पाठवू नका. मालक तिचे म्हणणे ऐकतो आणि काही दिवसांतच तरुणाचे वेतनही वाढवतो. मात्र, या उपकारांची किंमत तो सुंदर विधवेकडून वसूल करतो. जणू काही सौंदर्य आणि अस्मितादेखील नाणे आहेत, ज्याद्वारे परतफेड केली जाऊ शकते.
एकेदिवशी त्या महिलेचा मुलगा इतर कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून रात्रपाळीऐवजी सकाळची शिफ्ट करून लवकर घरी येतो तेव्हा त्याची आई कसेतरी मालकाला गुप्तरीत्या घरातून बाहेर काढण्यात यशस्वी होते. पुढच्या दिवशी तिच्या मुलाला पोलिस खुनाच्या आरोपावरून अटक करतात. कारण रात्रपाळीतच खून झाला आहे आणि शिफ्टची अदलाबदल झाल्याची रजिस्टरमध्ये नोंदही नाही. खुनाच्या वेळी तो आपल्या घरी होता. याची साक्ष त्याची आई आणि तिचा प्रियकर देऊ शकतात. आईची साक्ष अमान्य केली जाते. माझ्या निर्दोष मुलाला वाचवा, अशी विनंती ती कार्यालयाच्या मालकाला करते. मात्र, तो आपली सामाजिक प्रतिष्ठा पणाला लावू शकत नाही. त्याला आपला स्वत:चा संसार उद्ध्वस्त करून घ्यायचा नाही. 'तू माझ्या मुलाला वाचवले नाही तर मी तुझ्या पत्नीला सर्व काही सांगेल', अशी धमकी ती महिला मालकाला देते. घाबरलेला लंपट पती आपल्या पत्नीला सर्वकाही खरे सांगतो आणि त्याची न्यायप्रिय पत्नी त्या निर्दोष मुलाला सोडवून आणते. ती महिला आणि पत्नी समोरासमोर आहेत, परंतु पत्नी काहीच बोलत नाही. ती मुलाच्या उपस्थितीत मोठेपणा कायम ठेवते. कारण तिला लॅपटॉपची चोरी आणि तपासाचे प्रकरण माहीत आहे. मात्र, पतीच्या लंपटपणापासून ती अनभिज्ञ होती.
पाकिस्तानचे पोलिस धनाढ्य लोकांना प्रश्न विचारत नाहीत आणि आपल्याकडेही धनाढ्य व्यक्ती सहजपणे सुटका करून घेतात. जर पोलिसांनी त्या धनाढ्य महिलेला पुरावे मागितले असते तर 'तो निर्दोष तरुण त्या रात्री माझ्या खोलीत होता', असे ती आपल्या लंपट पतीला धडा शिकवण्यासाठी म्हणाली असती का? अशाच प्रकारचा संकेत कथेत आहे. अनेकदा असे आढळून आले आहे की, लंपट पतींचा बचाव करण्यासाठी त्यांच्या बायका शक्य होईल तेवढे प्रयत्न करतात. आपल्यासोबत केलेल्या विश्वासघाताचीही त्यांना चिंता नसते. त्यांच्या अहंकाराला ठेच लागत नाही का? हे याचे उत्तर असू शकते की, यशस्वी पतीद्वारे देण्यात आलेले आर्थिक संरक्षण आणि सुविधा त्यांना सोडाव्या वाटत नाहीत आणि मुलांचीही त्यांना काळजी असते. एखाद्या मुलाने आपल्या लंपट वडिलांच्या विरोधात पावले उचलल्याचेही कधी ऐकले नाही. त्यांना आपल्या आईवर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचा विचारही येत नाही का?
सारांश हा आहे की, संपूर्ण कुटुंबच भ्रष्ट आणि लंपट सदस्यांचे रक्षण करते. यालाच 'कौटुंबिक मूल्य' म्हटले जाते. हाच वर्ग भ्रष्टाचार आणि अन्यायाबाबत सर्वाधिक छाती ठोकत असतो. राजकुमार संतोषी यांच्या 'दामिनी'ची नायिका समृद्ध घराण्याची सून आहे. ती आपल्या दीराने मोलकरणीवर केलेल्या बलात्काराच्या विरोधात आवाज उठवते आणि न्यायालयात त्याची साक्ष देते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून समीक्षकांनीही त्याची प्रशंसा केली आहे. मात्र, चित्रपटाचा व्यवसाय कमी झाला. या चित्रपटाने तथाकथित 'कौटुंबिक मूल्या'चे निर्वहन केले नाही आणि ही कसली सून आहे, दिराला शिक्षा मिळवून देत आहे, असेही काही प्रेक्षक म्हणाले. वस्तुत: शैक्षणिक संस्थांमध्ये अक्षर ज्ञान आणि गणित इत्यादींचे शिक्षण दिले जाते. मुलांची नैतिक मूल्यांची पहिली शाळा त्यांचे कुटुंब आहे आणि असलेही पाहिजे. मात्र, वडील मुलास म्हणतात की, घरी येणाऱ्या व्यक्तीला पप्पा घरी नाहीत, असे सांग. तुम्हीच मुलास खोटे बोलायला लावता. आज शिक्षण, हॉटेल आणि रुग्णालये सर्वाधिक कमाई करणाऱ्या संस्थाझाल्या आहेत. या महान संस्थांमधून जीवन मूल्ये बऱ्याच प्रमाणात हद्दपार करण्यात आली आहेत. एका जाहिरातपटात 'डॉक्टर डॉक्टर' खेळणारी लहान मुलगी आपल्या वडिलांना प्रिस्क्रिप्शन देते आणि एक लाख रुपये फी मागते. वडील म्हणतात, एवढी जास्त फी का? वडिलांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणते, तुम्हाला माहीत नाही, वैद्यकीय शिक्षण किती महाग झाले आहे? आधारभूत समस्यांपेक्षा सुविधाजनक पलायन आपली राष्ट्रीय सवय बनली आहे.