आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूड अश्वमेध आणि भारतीय सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत भवनात आयोजित कार्यक्रमात कथा चित्रपटांचे शतक या विषयावर बोलताना मी म्हणालो की, कथा चित्रपट आपले दुसरे शतक पूर्ण करू शकणार नसून काही दशकांमध्ये कथा चित्रपटाचा मृत्यू शक्य आहे, असा अमेरिकेतील अनेक चित्रपट विचारवंतांना विश्वास आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एकाही दिवसाची शूटिंग करता एखाद्या सिनेताऱ्याचा चित्रपट तयार करणे शक्य आहे. उदाहरणार्थ, लता मंगेशकर यांनी गायलेल्या १० हजार गाण्यांचे अंश घेऊन, जे त्यांनी गायलेच नाही असे गाणे तयार केले जाऊ शकते. अशाच प्रकारच्या काही प्रयोगांद्वारे '३०० ब्लोंज' नामक चित्रपट हॉलीवूडमध्ये यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. याचा अर्थ हा आहे की, तंत्रज्ञानाद्वारे सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान अभिनीत चित्रपटही असेंबल केला जाऊ शकतो, पण हे वास्तवात शक्य नाही.
आज केवळ भारत, अमेरिका आणि चीन या तीन देशांमध्येच मोठ्या प्रमाणात चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. इंग्लंड, युरोप आणि जपानमध्ये मर्यादित संख्येतच चित्रपटांची निर्मिती होते. आज युरोपातील सर्वच देशांमध्ये बहुतांश चित्रपटगृहे हॉलीवूडच्या ताब्यात असून तेथे देशी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी मर्यादित कालावधीच मिळतो. यामुळे कमाईत घट झाल्याने निर्मितीसाठीही निधीचा अभाव असतो. हॉलीवूडच्या अर्थशास्त्रज्ञांनी अत्यंत कुशलतेने व्यूहरचना आखत अनेक देशांमध्ये सिनेमा जवळपास संपवला आहे. त्यांच्या या फिल्मी अश्वमेध यज्ञात फक्त भारतातील प्रेक्षकांच्या आपल्या चित्रपटांवरील प्रेमानेच या घोड्याला लगाम लावला आहे. भारतातील प्रदर्शन क्षेत्रात हॉलीवूड घुसखोरी करू शकला नाही. भारतीय चित्रपटगृहांमध्ये नेहमीच हिंदुस्थानी चित्रपटांच्या प्रदर्शनाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळेच भारत जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश बनला आहे. इंग्रजांच्या काळात करमणूक कर फक्त १२ टक्के होता, परंतु स्वातंत्र्यानंतर प्रादेशिक सरकारांनी त्यात वाढ करून १५० टक्क्यांपर्यंत पोहोचवला होता. मात्र, गेल्या दशकात अनेक प्रादेशिक सरकारांनी करमणुकीला करमुक्त केले. यात राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशचे सरकार अग्रस्थानी होते. असे वृत्त आहे की, राजस्थान सरकार पुन्हा करमणूक कर लावणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे भारतात चित्रपटगृहांना करमुक्त करणे अनेक कारणांनी आवश्यक आहे. अमेरिकेच्या प्रदर्शन क्षेत्र हडपण्याच्या षडयंत्रापासून भारतीय सिनेमाचा बचाव करणे आवश्यक आहे. नाही तर युवा वर्ग हॉलीवूडच्या विज्ञान फँटसीच्या नशेत सर्वकाही विसरून जाईल. दुसरे कारण म्हणजे चित्रपटगृहे नोकरीच्या संधी तर निर्माण करतातच, पण त्याच्याशी संबंधित अनेक व्यवसायदेखील यामुळे चालतात. चित्रपटगृहांमध्ये दररोज हजारो लोक येतात. त्यामुळे तेथे बाजाराचा विकास होतो. जाहिरातीसाठी सिनेमापेक्षा चांगली जागा कोणीच उपलब्ध करून देत नाही. तिसरे कारण म्हणजे वायू आणि पाण्याप्रमाणे करमणूकही आवश्यक आहे आणि वायुप्रमाणे यालादेखील करमुक्त केले पाहिजे. आज आयुष्य खूप कठीण आहे. विषम परिस्थितींना घाबरून सामान्य लोक सिनेमाच्या मनमोहक विश्वात काही वेळ आरामात घालवतात. सामान्य माणूस आपल्या घरात प्रेमळ व्यक्ती आहे, रस्त्यावर त्याला उन्माद चढू शकतो, पण चित्रपटगृहात त्याच्या आक्रोशाच्या भावनांचे विरेचन होते. सिनेमाचे मानसशास्त्रीय फायदे आणि नुकसानाचे विधिवत संशोधन झालेले नाही. भारत हजारो वर्षांपासून कथा वाचक आणि श्रोत्यांचा देश आहे. येथे परंपरा मरत नाहीत, जेट आकाशात उडते, तर पुलावरून वेगाने जाणाऱ्या रेल्वेगाडीसोबत पुलाखाली बैलगाडीही दिसते. त्यामुळे या देशाला शाश्वत म्हटले जाऊ शकते. येथे आधुनिकतेसह पारंपरिकतेचा एकोपाही भारताची ताकद आहे. विदेशात लग्न मरत आहेत, कुटुंब तुटत आहेत, पण भारतात असे नाही.