आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : नालासोपारा आणि डिस्ने: एबीसीडी-२

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील एका उपनगरामध्ये नालासोपारा ही गरिबांची वसाहत आहे. येथील काही युवकांनी आपला डान्स ग्रुप बनवला आणि तो एवढा लोकप्रिय ठरला की, त्यांना थेट अमेरिकेत संधी मिळाली. या सत्य घटनेवर आधारित 'एबीसीडी-२' आहे. याचा पहिला भागही यशस्वी ठरला होता. त्यात नवोदित कलावंत होते. त्यांचे नेतृत्व मायकल जॅक्सनपासून प्रेरित प्रभूदेवा करत होता. याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागात नवोदित कलावंत वरुण धवन आणि श्रद्धा कपूर काम करत आहेत. म्हणून बजेटही मोठे मिळाले आणि कौटुंबिक करमणुकीसाठी जगप्रसिद्ध डिस्ने कंपनीने याची निर्मिती केली आहे.
नृत्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती थ्रीडीमध्ये करण्यात आली. तसेच याची नॉर्मल प्रिंटही प्रदर्शित झाली आहे. अनेकदा थ्रीडीमध्ये फॉरमॅटचा वापर हॉरर विषयांसाठी केला जातो. त्यामुळे थ्रीडी इफेक्टमध्ये नृत्य पाहणे नवीन अनुभव असेल. मला आठवते की, भारतात 'छोटा चेतन' नावाच्या केरळमध्ये बनलेल्या बाल चित्रपटाने यश मिळवले होते तेव्हा अनेक निर्मात्यांनी अमेरिकेतून कचऱ्यामध्ये टाकलेले थ्रीडी कॅमेरे खरेदी केले होते. जणूकाही आपले विदेशोन्मुखी मेंढीची चाल असलेले लोक अमेरिकेतील केर-कचरा उचलून मेक इन इंडिया त्या काळातही करत होते. 'छोटा चेतन'नंतर बनलेले सर्व थ्रीडी चित्रपट अपयशी ठरले.
एकेकाळी तंत्रज्ञानाचे चूर्ण विकणाऱ्या काही लोकांनी जुन्या चित्रपटांचे थ्रीडीमध्ये रूपांतर करण्याचा बालिश प्रयत्न केला. एवढेच नाही तर अर्धवट ज्ञानाच्या आधारे 'शोले'ची थ्रीडी आवृत्तीदेखील अपयशी ठरली. वस्तुत: थ्रीडी प्रकारातील चित्रपट वेगळ्या पद्धतीने लिहिला जातो. त्याचे सेट्स वेगळ्या गणिताद्वारे तयार केले जातात. शिळी पुरी चहासोबत चांगली लागते, पण तंत्रज्ञानाच्या शिळ्या कढीला नवी उकळी दिली जाऊ शकत नाही. 'एबीसीडी-२'ची निर्मिती डिस्ने कंपनीने केली आहे. ही कंपनी १९२२ पासून या तंत्रज्ञामध्ये अग्रेसर आहे. चित्रपट निर्मितीमध्ये सिनेतारे वाजवी मानधनावर मिळत नसल्याने त्यांनी अॅनिमेशन चित्रपटांच्या युगास प्रारंभ केला आणि तेच या प्रकाराचे जनक ठरले.
जगातील डिस्नेच्या अॅनिमेशनपटांनी सर्वाधिक हसवले आहे. तसेच ते थीम पार्कमध्येही अग्रेसर राहिले आहेत. सिनेताऱ्यांवर अवलंबून राहता त्यावर योग्य पर्याय शोधा, हा डिस्नेचा मूलमंत्र आहे. या प्रयत्नामध्ये त्यांनी एक-दोन नव्हे तर करमणुकीचा संपूर्ण सौरमंडलच निर्माण केला आहे.
राजकुमार हिरानींच्या 'पीके'तील एक दृश्य आठवते. त्यामध्ये इतर नक्षत्रातून आलेला प्राणी पृथ्वीवरील दु:खी नायिकेला म्हणतो, आमच्याकडे दु:खी झाल्यावर आम्ही नाचतो, तेव्हा दु:ख दूर होते. अल्प ज्ञान असलेले लोक म्हणतात की, मनामध्ये प्रसन्नता असेल तर पाय थिरकतात. नाचल्याने दु:ख दूर होण्याचे शास्त्रीय कारणही मिळू शकते. शारीरिक चपळतेने फक्त रक्त प्रवाह हेलकावे खातो, तर मेटाबॉलिझम वाढल्याने रक्ताच्या लाटा मनालाही प्रसन्न करतात. वस्तुत: आम्ही हृदयाला मेंदूच्या बाहेर ठेवून मोठी चूक केली आहे. हृदय फक्त एक पंप असून आपण ज्याला भावनेचे स्थान म्हणत हृदय म्हणतो, ते मानवी मेंदूचाच एक भाग आहे. मानवी मेंदूतील दोन पक्षांमध्ये निरंतर वाद असतो.
मनाचे ऐकू की मेंदूचे, असे आपण फिल्मी अंदाजात म्हणतो; पण दोन्हीही एक संपूर्ण ब्रह्मांड म्हणजेच मेंदूचेच भाग आहेत. माणूस स्वत: कमकुवतपणा आणि आळस निवडतो आणि त्यांना हृदयाच्या खुंटीवर लटकवतो. तथापि, अमेरिकेत 'यंग वन्स', 'सॅटरडे नाइट फीव्हर' आणि 'डान्स इन रेन' इत्यादी नृत्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली आहे. 'एबीसीडी'मधील कलावंत नालासोपारा येथे जातील आणि तेथील युवकांना नमन करतील, अशी अपेक्षा आपण करूया.
बातम्या आणखी आहेत...