आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील : आजोबांच्या भूमिकेत ऋषी कपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण जोहरच्या 'कपूर अँड सन्स'ची शूटिंग जूनपासून वेगाने होणार आहे. यामध्ये ऋषी कपूर या कुटुंबातील 90 वर्षीय आजोबांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या मुलांच्या आणि नातवंडांच्या भूमिकांमध्ये अनेक सिनेतारे काम करतील. या भव्य बजेटच्या चित्रपटामध्ये कोणताच प्रस्थापित स्टार नाही, परंतु चित्रपटाची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. या चित्रपटात ऋषी कपूर यांच्या विशेष मेकअपसाठी अमेरिकेहून एका तज्ज्ञाला एक कोटी रुपये मानधनावर बोलावण्यात आले आहे. तसेच शूटिंगच्या वेळी त्याला दर आठवड्याला काही हजार डॉलर द्यावे लागतील. या विशेष मेकअपमध्ये तीन तासांपेक्षा थोडा जास्त वेळ लागेल आणि शूटिंगनंतर तो उतरवण्यासाठीही कमीत कमी एक तास दररोज लागेल. मेकअपच्या सुरुवातीपासून ते तो उतरवण्यापर्यंतच्या प्रक्रियेला शूटिंगसह दररोज दहा तास लागणार आहेत. तसेच ते या काळात जळ पदार्थ खाऊ शकणार नाहीत. ते फक्त स्ट्रॉद्वारे पाणी रस घेऊ शकतील. शूटिंग दररोज सकाळी 10 वाजता सुरू होऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालेल. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या शूटिंगसाठी ऋषी कपूर यांना दररोज सकाळी सातच्या आधी स्टुडिओत पोहोचावे लागेल. कलावंतांच्या भूमिकेच्या अनुरूप आपल्या दिनचर्येत बदल करावा लागतो.
तीन महिन्यांपूर्वीच अमेरिकेचा मेकअपमन भारतात आला होता. त्याने दोन-तीन प्रकारचा लूक दिला असून त्याची शूटिंग केल्यानंतर रशप्रिंट पाहून एक लूक अंतिम करण्यात आला. याच्या स्थिर चित्रामध्ये त्यांना त्यांच्या आईदेखील ओळखू शकल्या नाहीत. ऋषी कपूर यांनी आपले हे स्वरूप पाहून आपण नव्वद वर्षांपर्यंत जगल्यास कदाचित असेच दिसू, असा विचार केला असेल का? अभिनेता खूप नशीबवान आहे. तो आपल्या वेगवेगळ्या अवस्थांचा अनुभव घेऊ शकतो, स्वत:ला विविध रूपांमध्ये पाहू शकतो. ऋषी कपूर यांचे वडील आणि आजोबांनी सत्तरी पार केलेली नव्हती, परंतु त्यांचे पणजोबा बशेसरनाथ यांनी 1960 नंतर नव्वदी पार केली होती आणि त्यांची अंत्ययात्रा त्यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर यांनी गाजावाजात काढली होती. पणजोबांना नौका विहाराचा छंद होता. त्यामुळे मृतदेह घेऊन जाणारे वाहन नावेप्रमाणे तयार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच असे समजले की, बिकानेरच्या कला संस्थेने बशेसरनाथ यांचे वडील केशव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक कार्यक्रम आयोजित केला होता. आनंदाची गोष्ट म्हणजे कलावंतांच्या पणजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम घेणाऱ्या काही संस्था कार्यरत आहेत.
दुसरीकडे छत्तीसगड राज्यात जन्मलेल्या किशोर शाह यांच्या या जन्मशताब्दी वर्षात काहीतरी करण्यात यावे, अशी विनंती छत्तीसगड सरकारला मी अनेकवेळा केली आहे. राज कपूर यांच्या 'आवारा'मध्ये न्यायाधीशांची भूमिका बशेसरनाथ यांनी केली होती. तसेच न्यायालयाच्या दीर्घ दृश्यांमध्ये कपूर कुटुंबाच्या तीन पिढ्या हजर असायच्या. आज बहुतांश लोकांना आपल्या पणजोबांचे नावसुद्धा आठवत नाही.
उल्लेखनीय म्हणजे करण जोहर ऋषी कपूर यांच्या गेट-अपवर खूप खर्च करत आहे आणि अभिनेतासुद्धा खूप मेहनत घेत आहे. मात्र, प्रेक्षकास चित्रपटात आजोबांच्या भूमिकेत ऋषी कपूर असल्याचे चित्रपट संपल्यानंतरही माहीत होणार नाही. अशाच प्रकारच्या प्रोस्थेटिक्स मेकअपमुळे अभिनेत्याचे हाव-भावही दिसून येत नाहीत, फक्त आवाजाच्या उतार-चढावाद्वारेच भावना प्रकट केल्या जाऊ शकतात. संजीव कुमार यांनी दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी आवृत्तीमध्ये नवरसांचे प्रतीक असलेल्या भूमिका साकारल्या होत्या, पण पडद्यावरील प्रभाव मात्र सात मुखवट्यांचा होता.
प्राण यांनादेखील वेगवेगळ्या प्रकारचे गेट-अप करण्याचा छंद होता. देवकीनंदन खत्री यांच्या कादंबऱ्यांमधील पात्र दुसऱ्या माणसाचे रूप धारण करत होते. इच्छाधारी नागिणीच्या कपोलकल्पित कथांच्या आधारे श्रीदेवी नागीण असतानाही सुंदर स्त्रीचे रूप धारण करून नायकाची पत्नी होते. मला आठवते की, 95 प्रकारच्या सापांमध्ये विषच नसते, पण 100 टक्के माणसामध्ये विष म्हणजेच वाईट गोष्टी थोड्याफार प्रमाणात का होईना, असतातच. सापाने चावल्यावर माणूस वाचू शकतो, पण माणसाच्या विषावर कोणताच इलाज विज्ञानाकडे नाही.