आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय जलसागरात राखी सावंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राखी सावंतनेदेखील स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला असून ती स्वत: मुंबईतून निवडणूक लढवत आहे. तिने सादर केलेल्या शपथपत्रात तिची जवळपास आठ कोटी संपत्ती असून ती अशिक्षितही आहे. तिचा जन्म झोपडपट्टीत झाला होता. तिने प्रदीर्घ संघर्ष करत आर्थिक संरक्षण मिळवले आहे. तिच्या कमाईचा मुख्य स्रोत चित्रपटात अभिनय करणे हा नसून टीव्हीवर सादर केलेले तमाशे आहेत. त्यामध्ये तिचा 'स्वयंवर' नावाचा खेळदेखील समाविष्ट आहे.
राखी दिसायला खूप सुंदर किंवा सुडौल नाही. मात्र, आपल्या निबरुद्धपणालाच तिने पैसे कमावण्याची ताकद बनवले आहे. तिचा बढाया मारण्याचा स्वभावदेखील तिची मदत करतो. वाढदिवसाच्या कार्यक्रमात एका गायकाने घेतलेल्या चुंबनामुळेदेखील तिला प्रसिद्धी मिळवून दिली. ज्या देशात असंख्य शिकलेले लोक आयुष्यभराच्या प्रयत्नानंतरही एक कोटी रुपये कमावू शकत नाहीत त्या देशात या अशिक्षित मुलीने जन्मजात मिळालेल्या जमिनीपासून वर जात आपल्या कुटुंबीयांची मदतही केली आहे. या देशाच्या अनेक विरोधाभास आणि विसंगतींपैकी एक आहे राखी सावंत. ती आपल्या अपसंस्कृतीचा परिणाम असून आपल्या तमासगीर प्रवृत्तीचे वरदान आहे. तिचे अशिक्षित असणे तिची ताकद आहे. धाडस ही तिची एकमेव संपत्ती आहे.
जयप्रकाश चौकसे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...