आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज की रात नींद नहीं आएगी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'आज की रात नींद नहीं आएगी, सुना है तेरी महफिल में रतजगा है' हे गीत गुरुदत्त यांच्या 'साहब, बीबी और गुलाम'मध्ये पुरागामी जमीनदाराच्या जलसागरात मीनू मुमताज आणि सख्यांवर चित्रित करण्यात आले आहे. शूटिंगच्या वेळी डान्सर युनियनने पाठवलेल्या सर्व सख्या अत्यंत कुरूप चेहर्‍याच्या होत्या. मात्र, निरंतर नृत्यामुळे कमरेत लवचीकता आणि पायामध्ये चपळता होती. कुरूप चेहर्‍यांमुळे गुरुदत्त यांना शूटिंग करावीशी वाटत नव्हती. मात्र, त्यांचे कॅमेरामन व्ही. के. मूर्ती यांनी सांगितले की, मीनू मुमताज प्रकाशात राहतील, अशा प्रकारे मी प्रकाश योजना करेल. मात्र, 'सख्यां'च्या फक्त कमरेवर प्रकाश असेल आणि चेहरा अंधारात असेल. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर एका समीक्षकाने लिहिले की, सरंजामशाही समाजात महिलांचे चेहरे नाहीच्या बरोबर असतात. जणू काही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला काहीच अर्थ नसतो. या प्रकारचा अर्थ एखाद्या समीक्षकाला दिसला, ही व्ही. के. मूर्ती यांची कमालच म्हणावी लागेल. तथापि, दिग्दर्शकाची तर लाचारीच होती. खरं तर साहित्य आणि चित्रपट हे समीक्षकांच्या इंटरप्रेटेशनमुळे समृद्ध होतात. त्याच महान कॅमेरामनचे 90 व्या वर्षी सोमवारी रात्री बंगळुरू येथे निधन झाले.
चित्रपट इतिहासाच्या पहिल्या 50 वर्षांत भारतात चित्रपट विभागासाठी कोणतीही शिक्षण संस्था नव्हती, लोकांनी चुका सुधारून, स्वत:मध्ये सुधारणा करत ही विद्या शिकली. त्या काळात सहायक कॅमेरामन अनेक वर्षांपर्यंत सहायकच राहत. त्यांची निष्ठा आणि लायकी पाहूनच त्यांना संधी मिळत होती. याच गुरू-शिष्य परंपरेने आपल्याला अनेक तंत्रज्ञ दिले. व्ही. के. मूर्ती हेदेखील जाल मिस्त्री यांचे सहायक होते. नंतर देवआनंद यांचे कॅमेरामन व्ही. रात्रा यांचेही सहायक म्हणून काम केले. त्याच वेळी त्यांची भेट गुरुदत्त यांच्याशी झाली. गुरू-शिष्य परंपरेच्या त्या काळात कोणत्याही संस्थेत न गेलेले अनेक प्रतिभावंत कॅमेरामन चित्रपटसृष्टीला मिळाले. त्या काळातील राधू करमरकर, फरदून इराणी इत्यादी या परंपरेतूनच आले आहेत. पुणे येथील संस्थेतून आपल्याला गोविंद निहलानी मिळाले. मात्र, भारतीय चित्रपटसृष्टीच्या फोटोग्राफीच्या इतिहासात सर्व महान कॅमेरामन या गुरू-शिष्य परंपरेतून आले होते. याचाच अर्थ असा नव्हे की नियमानुसार शिकवणार्‍या संस्था त्या काळी नव्हत्या. आज तर तंत्रज्ञानाने या क्षेत्रात कमाल केली आहे, पण कृष्ण-धवल चित्रपटांच्या त्या काळात विलक्षण कॅमेरामन तयार झाले. तेव्हाच्या आसिफ यांच्या 'कांच महल'ची शूटिंग विदेशी कॅमेरामन करू शकले नाहीत, तेव्हा आर. डी. माथूर यांनी चादरींद्वारे प्रकाश परावर्तित करत हे काम करून दाखवले.
आपल्या एका गुन्हेगारीवर आधारित चित्रपटात प्रकाश योजनेसाठी परिश्रम करत असलेल्या मूर्ती यांना गुरुदत्त यांनी वचन दिले होते की, एके दिवशी ते असा चित्रपट बनवतील ज्याचे श्रेय कॅमेरामनला दिले जाईल. काही वर्षांनंतर त्यांनी 'कागज के फूल' चित्रपट बनवला. हा भारताचा पहिला सिनेमास्कोप चित्रपट आहे. तसेच याच चित्रपटाच्या मध्यांतरात शम्मी कपूरने व्ही. के. मूर्ती यांना चित्रपटाचा 'नायक' असे संबोधले होते. 'प्यासा' चित्रपटात व्ही. के. मूर्ती यांनी वहिदा रहमान यांना एवढय़ा कलात्मक पद्धतीने फोटोग्राफ केले की, संपूर्ण देश मंत्रमुग्ध झाला. 'प्यासा'च्या क्लायमॅक्समध्ये सभागृहाच्या दारावर नायक उभा आहे आणि पाठीमागून उजेड येत आहे. येशू ख्रिस्तांना फासावर चढवण्याचा प्रभाव गुरुदत्त आणि मूर्ती यांच्या सहकार्याने शक्य झाला. खरे तर छायाचित्रकाराला तांत्रिक ज्ञानाबरोबरच साहित्याचादेखील स्पर्श असणे आवश्यक आहे. त्याला पात्रांच्या मन:स्थितीचा अभ्यास करता आला पाहिजे. तसेच संवेदनांचे संप्रेषण कसे प्रभावोत्पादक पद्धतीने व्हायला हवे, याची प्रखरतेने परिपूर्ती असायला हवी. कॅमेरा कोणही चालवू शकतो, पण फ्रेमची सार्थकता कॅमेरामन आणि दिग्दर्शकाच्या एकमेकांच्या तर्कशक्तीवर अवलंबून असते. कारण व्ही. के. मूर्ती यांनी गुरुदत्त यांच्या अवेळी निधनानंतर काही चित्रपट केले, पण त्यात पहिल्यासारखा दम नव्हता. सर्व उपकरणे तीच होती, पण ती साथ नव्हती. याच प्रकारे राधू करमरकरने आरके स्टुडियोच्या बाहेर 'संन्यासी' इत्यादी अनेक चित्रपटांचे शूटिंग केले. मात्र, राज कपूरसोबत त्यांचे काम आंतरराष्ट्रीय पातळीचे होते.
चित्रपट समीक्षक हेमचंद्र पहारे यांचे असे मत आहे की, चित्रपट पाहिल्याने डोळ्यांना आराम आणि मनाला आनंद मिळत नाही. मात्र, कृष्णधवल चित्रपट पाहिल्याने डोळे अपेक्षेनुसार कमी दुखतात. खरे तर कृष्ण-धवल चित्रपटांमध्ये रात्रीची दृश्ये करणे सोपे काम नव्हते आणि 'फील्ड में गहराई' आणणे अधिकच कठीण होते. व्ही. के. मूर्ती तर एक चित्रकार होते. प्रकाश व छाया त्यांचे ब्रश होते, तर कॅमेरा सर्जनशील मेंदूत होता. माणसाच्या अवचेतनाचे भाव त्याच्याच शरीराच्या एखाद्या भागात एक छोटीशी खिडकी पाहतात. ज्यामध्ये त्यांची झलक दिसून येते की, एक चांगला कॅमेरामन याच खिडकीचा शोध घेत आहे..