आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाचा इतिहास आणि देशभक्तिपर चित्रपट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय चित्रपटात शंभर वर्षांच्या इतिहासात प्रत्येक कालखंडात देशभक्तीचे चित्रपट बनले ज्यांचे प्रामुख्याने तीन श्रेणींमध्ये विभाजन केले जाऊ शकते. प्रारंभिक मुक चित्रपटांचा कालखंड, तेव्हा ब्रिटिश सेन्सॉरपासून वाचण्यासाठी देशप्रेमाची भावना धार्मिक आख्यायिका आणि इतिहासावर आधारित काल्पनिक कथांच्या माध्यमातून अभिव्यक्त केली गेली.
उदाहरणार्थ १९१८ मध्ये संपतलाल शाह यांच्या "महात्मा विदूर' चित्रपटातून महाभारताची कथा प्रस्तुत करण्यात आली होती, परंतु विदुरांना गांधीजींसारखे दाखवण्यात आले आणि प्रेक्षकांनाही कळले होते की, हे महाभारत नसून स्वातंत्र्यसंग्रामाचे संकेत आहेत. स्वातंत्र्यसंग्रामाला महाभारताप्रमाणे पाहिले तर गांधीजी यामध्ये कृष्ण राहिलेले आहेत. लोकमान्य टिळकांच्या वृत्तपत्राचे सहायक संपादक राहिलेल्या भालजी पेंढारकरांनी "वंदे मातरम्' नावाचा गांधींच्या शिकवणीवर आधारित चित्रपट बनवला होता. राजकुमार हिराणीच्या "थ्री इिडयट्स'मध्येही त्यांची शिकवण कमी-अधिक प्रमाणात दिसली.
चित्रपटाच्या इतिहासातून गांधीजींचे आदर्श वेळोवेळी समोर आले आहेत. जसे की, व्ही. शांताराम यांचा "दो आंखे बारा हात' आणि याची व्यावसायिक आवृत्ती म्हणजे सुभाष घई यांचा "कर्मा'. तसेच हिमांशू रॉय यांच्या १९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या "कर्मा'वरदेखील गांधीजींचा प्रभाव होता. १९१३ ते १९४७ पर्यंत बनलेल्या सर्व संत कवींवर आधारित चित्रपटांमध्येही देशभक्तीचा संकेत होता. सोहराब मोदी इतर दिग्दर्शकांच्या इतिहासावर आधारित चित्रटातूनदेखील देशभक्तीचा संदेश देण्यात आला, जसे "सिकंदर', "अदले जहांगीर', "शाहजहां' आणि हरिकृष्ण "प्रेमीं'चा "चितौड विजय'सुद्धा हीच बाब अधोरेखित करतो. उल्लेखनीय म्हणजे पारतंत्र्याच्या काळात सेन्सॉरच्या डोळ्यात धूळ फेकून दिग्दर्शकांनी देशभक्तिपर चित्रपटांची निर्मिती केली. नागरिकांचे चरित्र चांगुलपणाच्या शिखरावर होते आणि साहित्यदेखील त्याच आदर्शने ओतप्रोत होते.
तो सांस्कृतिक नवजागृतीचा अभूतपूर्व काळखंड राहिलेला आहे. चित्रपट तरी यापासून दूर कसे राहतील. चित्रपटसृष्टी काही देशापासून वेगळे असलेले बेट नाही. पारतंत्र्यातील कालखंड आिण स्वातंत्र्यकाळाच्या सीमेवर प्रदर्शित झालेला दिलीप कुमार अिभनीत 'शहीद'च्या 'वतन की राह में वतन के नौजवान शहीद हो...' गीताला मोहंमद रफींनी असे काही तीव्र भावनांनी गायले की, चित्रपटगृहात झालेला टाळ्यांचा कडकडाट वातावरणात कायमचा अंतर्भूत झाला. पंजाबमधील शालेय शिक्षक पंडित सीताराम शर्मा यांनी भगतसिंग यांच्यावर संशोधन करून पटकथा लिहिली. या पटकथेवर मनोज कुमार यांनी वाङमयीन "शहीद' चित्रपट बनवला आणि देशभक्ती त्यांच्या चित्रपटांचा स्थायीभाव झाला, परंतु "शहीद'नंतरच्या चित्रपटात नारेबाजी आणि ढोंगी देशप्रेमाची छाया पडली. ही देशभक्ती बॉक्स ऑफिसच्या आवृत्तीप्रमाणे पुढे आली.
चेतन आनंद यांचा चीन युद्धाने प्रभावित "हकीकत' वास्तविक युद्ध चित्रपट नाही, तर रिट्रीट सिनेमा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चित्रपटात नेहरू कालखंडाचा पहिला चित्रपट चेतन आनंद यांचा "नीचा नगर' आिण शेवटचा "हकीकत' आहे, जणू काही नेहरू धोरणांवर आधारित चित्रपट स्वप्नांचे भंग होणेदेखील चेतन आनंदच्या चित्रपटासोबतच झाले. चित्रपटाच्या सुवर्णकाळातील "हकीकत' शेवटचा चित्रपट आहे. उल्लेखनीय म्हणजे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय चारित्र्याच्या पतनाला आपण त्याच्या ढोंगी देशभक्तीच्या चित्रपटांमध्ये पाहू शकतो. जीवनमूल्ये आदर्शाची लाट गांधी कालखंडात वर आली आिण नंतरच्या कालखंडात ती जणू काही जमिनीखाली प्रवाहित झाली, असा निष्कर्षही आपण काढू शकतो. जणू काही ती सदैव विद्यमान आहे, कधी खाली आणि कधी कधी वर दिसून येते.
आमिरचा "लगान' आणि राकेश मेहराच्या "रंग दे बसंती' या चित्रपटांनी ढोंगी देशभक्तीला दिखाऊ चित्रपटांपासून मु्त करून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचे देशप्रेम दाखवले. या साखळीत आपण "अ वेनसडे', "पानसिंग तोमर' आणि "भाग मिल्खा भाग' आदी चित्रपट पाहू शकतो. देशभक्तीची भावना जागृत करणारा केतन मेहताचा "सरदार', श्याम बेनेगलचा "नेताजी सुभाषचंद्र बोस'सारखे बायोपिकसुद्धा बनले. या श्रेणीतील सर रिचर्ड अटेनबरो यांचा गांधी आिण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बनलेले चित्रपट श्रेष्ठ ठरले. श्याम बेनेगल यांचा "मेकिंग ऑफ महात्मा', टीव्ही मालिका "डिस्कव्हरी ऑफ इंडिया' तसेच अलीकडील "संविधान'ही महत्त्वपूर्ण आहे. या लेखात सर्वच चित्रपटांची माहिती नाही, पण एका वर्गीकरणाच्या माध्यमातून अस्सल चित्रपट आिण ढोंगी देशभक्तीच्या चित्रपटांसोबत आधुनिक कला मापदंडावर उभारलेल्या चित्रपटांचा उल्लेख आहे. तसेच पृष्ठभागावर आणि पृष्ठभागाच्या खाली प्रवाहित राहिलेल्या राष्ट्रप्रेमाच्या प्रवाहाचा उल्लेख आहे.