आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नसीरुद्दीन यांच्या पहिल्या पत्नी होत्या त्यांच्यापेक्षा वयाने 15 वर्षे मोठ्या, दुस-या आहेत 7 वर्षांनी लहान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला जखमी आणि कलंकित आत्मा निर्दयीपणे सर्वांसमोर ठेवण्याची हिंमत आजपर्यंत कुणी दाखवली नसावी. मात्र, नसिरुद्दीन शाह यांच्या आत्मकथेतील प्रामाणिकपणाला तुम्ही शेकडो सूर्यांच्या हृदयात भडकण्याच्या अनुभवाप्रमाणे म्हणू शकता. अनेकदा सिनेताऱ्यांची आत्मकथा त्यांच्या पडद्यावर सादर झालेल्या प्रतिमेचा तपशील असतो, पण नसीर तर आपल्या सुप्त मनातील सर्व प्रकारची भीती आिण स्वप्नांना त्याच कसायाप्रमाणे सादर करत आहेत, जो मांस विक्रीच्या दुकानावर खिमा कुटत आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वातील कोणताच कमकुवतपणा त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला नाही.
नसीर यांच्यासाठी या पुस्तकाचे लिखाण, जणू काही एखादा शल्य चिकित्सक स्वत:चीच चिरफाड करत आहे आिण कोणत्याच प्रकारचे बधिरीकरणही करण्यात आलेले नाही, याप्रमाणे झाले असावे. हा बेशुद्धावस्थेत करण्यात आलेला आठवणींचा तपशील नाही, पण पूर्णपणे भानावर असताना आपल्या सुप्त मनातील सर्व अंधाऱ्या कोपऱ्यांना हजारो वॉटच्या प्रकाशात सादर करण्यासारखे आहे. नसिरुद्दीन शाह यांनी चित्रपटाची शूटिंग आिण रंगमंचावरील प्रकाशात अंघोळ केली आहे. तसेच आपल्या सुप्त मनातील रहस्यमयी गुहेत ते काजव्याचा मंद प्रकाशात नाहीत, तर त्याच हजारो वॅटच्या प्रकाशात स्वत:ला उघड करत आहेत. त्यांनी हे पुस्तक चर्चमधील कन्फेशन रूमप्रमाणे सादर केले आहे. त्यामध्ये कबूल करून घेणारा आिण पडद्याच्या पलीकडे देखील ताेच उभा आहे. एवढी हिंसक स्पष्टता यापूर्वी कधीच समोर आली नाही.
नसीर आयुष्यभर स्वत:शी लढत राहिले, वादविवाद करत राहिले, पण कधीच कोणत्या निष्कर्षाप्रत किंवा निर्णयापर्यंत पोहोचले नाहीत. कारण आयुष्य एखादे न्यायालय नाही की जिथे गुन्हा आणि पुराव्यांच्या आधारे एखादा निर्णय दिला जाऊ शकेल, तर आयुष्य सातत्याने सुरू असलेला खटला आहे आिण न्यायाधीशही पिंजऱ्यात उभा आहे. नसिरुद्दीन शाह आपल्या सुप्त मनात लपलेल्या भीतीसोबत आयुष्यभर झुंज देत राहिले. एक काळ असाही होता, जेव्हा ते त्या भीतीमध्ये आनंद मिळवत राहिले. या प्रक्रियेत मिळालेले उत्तर किंवा त्याच्या संकेताची एखादी अभिलाषा त्यांच्या मनात कधीच राहिली नाही. आज ६५ वर्षांच्या टप्प्यावर आरशात त्यांना त्यांची एक अतिरिक्त प्रतिमादेखील स्वत:मध्ये दिसून येते. या प्रतिमेशी ते सामना करत आले आहेत आिण हीच प्रतिमा आपल्या विविध स्वरूपांमध्ये त्यांची सहप्रवासीदेखील राहिली आहे. मी नसीर साहेबांना असे सांगू इच्छितो की, या सहप्रवाशाला छाया पुरुषही (हमजाद) म्हटले जाऊ शकते. इस्लामिक साहित्यात हमजाद संकल्पना आहे की, मनुष्याच्या जन्मासोबतच त्याच्यामध्ये राक्षस असतो. अंतर्गत लढा नेहमीच चालत आला आहे आिण सातत्याने चालत आलेल्या या लढ्यालाच आयुष्यही म्हटले जाते.
नसीर यांची पहिली पत्नी परवीन त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठी होती आणि रत्ना पाठक सात वर्षांनी लहान आहेत. मात्र, आपले व्यक्तिमत्त्व परिपक्व असण्याच्या मोजपट्टीवर रत्ना नसीर यांच्यापेक्षा हजारो वर्षे मोठ्या आहेत. आजच्या बाजारात तर लोकांना परिपक्व होण्यापूर्वीच स्वत:ला विकावे वाटते. मात्र, रत्ना पाठक कदाचित वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ज्याच्या फांद्याच पुन्हा पृथ्वीवर प्रवेश करत त्याची मुळे बळकट करतात, अशा वडाच्या झाडासारख्या आहेत.
रत्ना नसीर यांच्यापेक्षा जास्त मूडी स्वभावाच्या आणि भांडखोर आहेत, पण त्यांच्याकडे स्वभावाच्या या बाजूचे ताकदीत रूपांतर करण्याची कुवत आहे. रत्ना यांनी तर आपल्या वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांचा विखुरलेला व्यवसाय एक वकील आणि चार्टर्ड अकाउंटंटच्या एकत्रित पात्रतेवर उभा केला. त्या अशा महिला आहेत की, चार जुने स्वेटर उधळून त्यांचे धागे एकमेकांत मिसळले, तरी त्यातील धागे एकमेकांना जोडू शकतील. याचा अर्थ हा नाही की, त्या खरोखरच स्वेटर विणताना गुणगुणत असाव्यात की, 'बून रहे हैं हम ख्वाब दम दम, वक्त ने किया क्या हंसी सितम.' रत्ना पाठक यांनी याच कुशलतेने विखुरणाऱ्या नसीर यांना सांभाळले. ही जोडी देवाने तयार केली नाही, तर ती रंगमंचावर तयार झाली आहे. मात्र, या नात्यामध्ये नाटकीपणा नाही, तर जीवनाचे स्पंदन आहे. नसिरुद्दीन शाह यांनी इंग्रजी ग्रंथ रचला आणि योग्य इंग्रजी वाचण्याच्या मोहासाठीदेखील पुन्हा वाचली जाऊ शकते. हे पुस्तक मानवी कमकुवतपणांचा एपिक आहे आिण 'लार्जर दॅन लाइफ' पात्रांच्या अभ्यस्त पाहा, हकिगत किती भव्य असू शकते.