आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : धर्मेंद्र यांचा बायोपिक आणि सलमान खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रीच कँडी रुग्णालयात एक आठवडा उपचार करून धर्मेंद्र घरी परतले, पण काही दिवसांनंतर त्यांना खाद्यांची शस्त्रक्रिया करावी लागेल. एका शिक्षकाचा मुलगा असलेल्या ८९ वर्षीय धर्मेंद्र यांचे शरीर पंजाबच्या मातीपासून बनले आहे. तेथील हवामान त्यांच्या नसांमध्ये रक्त बनून प्रवाहित आहे. त्यांनी जितके ग्लास लस्सीचे सेवन केले त्याहीपेक्षा जास्त दारू घेतली आहे. यापेक्षा थोड्या वेगळ्या आशयाची कासिफ इंदुरी यांची एक कविता आठवली, 'सरासर गलत है इलजामे बला नोशी का, जिस कदर आंसू पीए है, उससे कम पी है शराब.' अनेक वर्षांपूर्वी ऐकलेल्या या कवितेतील शब्द थोडे खाली-वर झाल्याबद्दल क्षमा मागतो.
या कवितेचा वापर मी माझ्या 'शायद' चित्रपटातदेखील केला होता. तथापि, जाट धर्मेंद्र यांच्या मजूबत खांद्यानी अनेक संकटे पेलली असून अनेक नायिकांनादेखील खांद्यावर उचलले आहे. यातील काही जणी त्यानांच चिकटल्या आणि खांद्यावरून उतरण्यास तयार नव्हत्या. याच खांद्यांवर त्यांनी आपला दीर्घ आणि कटू संघर्षदेखील पेलला आहे. कुटुंबासोबतच काही अन्य जबाबदाऱ्या देखील त्यांच्यावर होत्या. त्यांचा जुहू येथील भव्य बंगला मुंबईतील पंजाबचा देह आहे. शेवटी खांद्याची मन:स्थितीदेखील स्वतंत्र असते. त्यांचा एक खांदा नाराज झाला आहे.
आजकाल शस्त्रक्रियेद्वारे गुडघा, खांदा सर्व बदलले जातात. फक्त साधनहीन मजूर आणि शेतकऱ्याचे भाग्यच बदलता येत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कृपादृष्टी प्रत्येक छतावर पडत नाही, ते आपल्या गोष्टी सावधगिरीने निवडतात. आजकाल तर महानगरांमध्येही पाऊस उच्चभ्रू वसाहतींमध्येच जास्त पडतो आणि निदा फाजली यांच्या आशावादावर पाणी पडते की, 'बरसात का आवारा बादल क्या जाने किस छत को भिगाना है, किस छत को बचाना है.'
धर्मेंद्र अनेक मैल पायी चालत जाऊन चित्रपट पाहण्यास जात असत. या वेडेपणाचा सुखद परिणाम बऱ्याच काळाच्या संघर्षानंतर दिसून आला. पहिलवान धर्मेंद्र रोमँटिक होते आणि त्यांनी कवितेचा छंदही जोपासला होता सांगणेदेखील योग्य ठरेल. त्यांनी भरपूर कवितादेखील लिहिल्या आहेत. हे शक्य आहे की, अभिनेत्री मीनाकुमारी यांच्यासोबत बराच काळ चाललेल्या प्रेमप्रकरणामुळे पहिलवान कवीदेखील झाले असावेत.
वस्तुत: प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या मनात एक कवी दडलेला असतो, पण व्यावहारिकतेच्या निर्दयी मागणीमुळे त्याला आपल्यातील कवी मारावा लागतो. साहित्यातील या कवितांची सामान्य व्यक्ती अनेकदा शिकार करत आला आहे. मेलेल्या सिंहावर पाय ठेवून राजे-महाराजे फोटो काढत राहिले. मात्र, सामान्य व्यक्ती असे करत नाही. खरे म्हणजे अनेक राजे-महाराजे, नवाब आणि इंग्रजांनी ज्या सिंहांच्या अंगावर पाय ठेवून फोटो काढले, त्यापैकी बहुतांश सिंहांना तर राखण करणाऱ्यानेच ठार मारले आहे. कधी कधी अशा प्रकारेही दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून बंदूक चालवली जाते. अनेकदा नेते भांडवलदारांच्या खांद्यावर आणि भांडवलदार नेत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जनतेची शिकार करतात.
व्यावहारिकतेच्या मागण्यांच्या नावावर काय काय होते, त्याचा नमुना अशा प्रकारे समोर आला आहे. धर्मेंद्र यांचा बायोपिक सलमान खानसोबत बनवला जावा, असा विचार सध्या निर्माते करत आहेत. सर्वप्रथम धर्मेंद्र यांनीच शरीरसौष्ठव प्रदर्शन केले होते. मीनाकुमारी यांच्यासोबत 'फूल और पत्थर'मध्ये त्यांनी आपल्या शरीराचे प्रदर्शन केले होते. आता तर सलमानला आपल्या प्रत्येक चित्रपटात शर्ट काढावे लागते. कारण त्याच्या चाहत्यांची हीच इच्छा असते. लोकप्रिय प्रतिमा अशा प्रकारे बेड्या बनतात. धर्मेंद्र आपला बायोपिक त्यांचा मुलगा सनी देओलसोबतदेखील बनवू शकले असते, पण सनी देओल आजच्या घडीचा मोठा स्टार नाही. म्हणून सलमान खानसोबत चित्रपट बनवल्यास आर्थिक फायदा जास्त होऊ शकतो हे साधे-सोपे गणित आहे. धर्मेंद्र यांच्या साम्राज्याचा वारसदार सनी देओल असला तरी बॉक्स ऑफिसकेंद्रित सिनेमामध्ये या जागेवर सलमान खानचा हक्क आहे. म्हणून तर 'सिनेमा औघड गुरु का औघड ज्ञान, पहले भोजन फिर स्नान' म्हटले जाते.
बातम्या आणखी आहेत...