आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील : पहिलवान आमिर खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय शैलीच्या कुस्ती स्पर्धेला दंगल म्हटले जाते. ही स्पर्धा म्हणजे इतर प्रकारचे खेळ आणि युद्धापेक्षा वेगळ्या प्रकारच्या क्षमतेची परीक्षा आहे. यामध्ये पहिलवानाचे शरीरच त्याची एकमेव शिदोरी आहे आणि डाव टाकण्याचेही एक शास्त्र असते. वस्तुत: आखाडे भारतीय संस्कृतीचा भाग आहेत. त्यामध्ये उपचाराचादेखील समावेश आहे. अनेक शहरांमध्ये आजही कुस्ती खेळातून निवृत्त झालेले पहिलवान स्नायू आणि तुटलेल्या हाडांचे उपचार करतात. आपल्याकडे धार्मिक संप्रदायांचे आखाडे वेगळ्या प्रकारचे असतात. ते कुंभमेळ्यांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरतात. सलमान खान आणि जॉन अब्राहम दोघांनीही गामा पहिलवानचा बायोपिक रद्द केला आहे. गामा पहिलवानला पाकिस्तानचे लोकही 'रुस्तमें हिंद' म्हणून संबोधत होते.
'चिल्लर पार्टी' सारख्या कमी बजेटच्या गुणवत्तापूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शक नीतेश तिवारी लिखित आणि दिग्दर्शित 'दंगल'मध्ये आमिर खानने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यूटीव्हीने यात पैसा गुंतवला आहे. आमिरने एखाद्या चित्रपटाशी करार केल्यावर त्याला भरपूर प्रसिद्धी मिळते. अशाच पद्धतीने त्याने आपले करिअर घडवले आहे. 'लगान'पासून ते 'पीके'पर्यंतच्या त्याच्या विषय निवडीमधून दोन गोष्टी समोर येतात. एक म्हणजे कथा चाकोरीबद्ध नसते आणि दुसरे म्हणजे त्यामध्ये भव्य यशाची शक्यता असते. आपल्या कथा निवडीमुळेच अभिनेत्याचे त्याचे स्वरूप बहरत चालले आहे. तो प्रत्येक भूमिकेसाठी आपल्या शरीराला नवा लूक देतो.
'गजनी'साठी त्याने वर्षभर तयारी केली आणि 'धूम ३'साठीदेखील अनेकदा शूटिंग स्थगित केली. कारण तो आपले शरीर भूमिकेप्रमाणे बनवत होता. तो आपल्या शरीराचा वापर बासरीप्रमाणे करतो. गेल्या शतकातील तिसऱ्या दशकात एका चित्रपटातील गाण्याचा मुखडा असा होता, 'विरह ने कलेजा यूं छलनी किया, जैसे जंगल में कोई बांसुरी पडी हो.' भारतीय चित्रपटांचे गीत-संगीतही विरळ खजिना आहे. त्यामध्ये मानवी संवेदना गुंजतात.
आमिर खान चित्रपटामध्ये दोन कुमारवयीन मुलींच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. एकेकाळी तो आखाड्याचा पहिलवान असल्याचेही दाखवले आहे. आपल्या देशामध्ये पिता-पुत्र नात्यावर खूप चित्रपट बनले, पण बाप-लेकीच्या नात्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न फार कमी झाला आहे. कारण आपण मुलांचे शस्त्रांप्रमाणे पालन-पोषण करतो आणि मुलीला डोक्यावर लटकती तलवार मानतो. याच भेदभावाच्या दृष्टिकोनाने भव्य सामाजिक अंधश्रद्धेला जन्म दिला आहे. विदेशातही स्त्रियांसोबत कमी किंवा जास्त प्रमाणात भेदभाव होत आला आहे. मात्र, तेथे बाप-लेकीच्या नात्यावर खूप चित्रपट बनले. या नात्याची बारीक वीण अशा प्रकारेदेखील प्रकट होते की, मुले आईचे लाडके असतात आणि मुलींचे वडिलांवर खूप प्रेम असते. हे अतिरिक्त प्रेम आईद्वारे मुलाला अधिक महत्त्व देण्याची प्रतिक्रिया आहे का? हे खरे आहे की, वृद्धावस्थेत मुलीच आई-वडिलांची जास्त देखभाल करतात. आजारपणाच्या क्षणांमध्ये वडिलांना मुलीच्या मागे उभ्या असलेल्या आपल्या स्वर्गीय आईची प्रतिमा दिसते. जसे मी पूनम आणि आनंद मोहन माथूर यांच्यात पाहिले आहे.
'दंगल'मध्ये मुलींच्या भूमिकांसाठी दोन मुलींची निवड करण्यात आली आहे. आमिर खानच्या पत्नीची भूमिका छोटीच असून या भूमिकेसाठी अद्याप कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही. कारण पत्नीच्या निधनानंतर वडिलांनीच मुलींचा सांभाळ केला आहे. दुसऱ्या पातळीवर 'दंगल' भारतात तरुणी आपल्या सुरक्षेबाबत जो लढा देत आहेत, त्या सातत्याने सुरू असलेल्या युद्धाचे प्रतीक आहे. बीबीसीच्या वादग्रस्त 'इंडियाज डॉटर्स'मध्ये दुष्कृत्य करणाऱ्याचा स्वीकार करताना दाखवले आहे. म्हणजेच अशिक्षितांना सायंकाळी घरातून बाहेर पडणारी प्रत्येक तरुणी दुष्कृत्याची निमंत्रण-पत्रिका वाटते. तसेच निर्भयाने प्रतिकार केला नसता तर त्याने एवढ्या निर्दयीपणे तिला मारले नसते. या आशयाचा संवाद चोप्रा यांच्या 'इंसाफ का तराजू'मध्येही होता. हा संवाद पुरुषी विचार प्रक्रयेचा पुरस्कार करतो.