Home | Parde Ke Pichhe | Ranbir Kapoor And Katrina Kaif

पडद्यामागील : सिंड्रेला कतरिना आणि स्टोरीटेलर रणबीर, असा घडला दोघांत 'प्रेम' नावाचा चमत्कार

जयप्रकाश चौकसे | Update - Feb 12, 2016, 05:00 AM IST

रणबीर आणि कतरिनाने दोन वर्षांपूर्वी सजवलेले 'घरटे' सोडल्याचे वृत्त आहे. याचा अर्थ त्यांचे ब्रेकअप होऊ शकते.

 • Ranbir Kapoor And Katrina Kaif
  एकीकडे रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे दोघेही एका मोटारसायकलवर बसून रात्रभर मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारत असल्याची छायाचित्रेदेखील प्रकाशित झाली आहेत. दोन प्रेमींमधील प्रेम किंवा ब्रेकअप अत्यंत खासगी आणि गोपनीय बाब असून संपूर्ण सत्य कधीच समोर येत नाही. राज कपूर यांच्या 'संगम'मध्ये शैलेंद्र यांच्या गीताच्या काही ओळी अशा आहेत, 'प्यार की दुनिया में दो दिल मुश्कील से समा पाते हैं, यहां गैर तो क्या अपनों तक के साये भी पाते हैं, ये धरती है इन्सानों की, कुछ और नहीं इन्सान है हम, मेरे सनम, एक दिल के दोन अरमान हैं हम.' गोंधळ हा आहे की, आपण प्रत्येक वेळी देवता आणि दानवांच्या दंतकथांमध्ये गुरफटून जातो आणि माणसाकडे दुर्लक्ष होते.
  रणबीर आणि कतरिनाने दोन वर्षांपूर्वी सजवलेले 'घरटे' सोडल्याचे वृत्त आहे. याचा अर्थ त्यांचे ब्रेकअप होऊ शकते. असेही होऊ शकते की, रणबीरची पत्नी होऊन कतरिना ऋषी कपूर आणि नीतू यांच्या पाली हिल स्थित 'कृष्णाराज' बंगल्यामध्ये प्रवेश करणार असेल. लग्न करता सोबत राहण्याचा हादेखील परिणाम होऊ शकतो की, मेंदी आणि हळद लावलेल्या पावलांनी नवरी पतीच्या दारी येऊन धान्याचे भांडे लोटेल.
  पुढे वाचा, रणबीर आणि कतरिना दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी आहे खूप वेगळी...

 • Ranbir Kapoor And Katrina Kaif

  रणबीर आणि कतरिना दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी खूप वेगळी आहे. कतरिना कैफ विभक्त कुटुंबातील मुलगी असून तिच्या सुंदर खांद्यांवर मोठ्या कुटुंबाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे तिला एखाद्या चमत्काराची गरज होती. ती भारतात आली. कारण इथे अनेकदा चमत्कार घडतात आणि तर्क गुडघे टेकतो. भारतीय नसताना आणि नृत्य येत नसतानाही ती भारतात आली. इथे आल्यावर तिला 'बूम' नावाच्या दर्जाहीन चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर संधीच्या शोधात असलेल्यांना संधी मिळवून देणाऱ्या सलमान खानशी तिची अचानक गाठ पडली. याच सलमानला खुदाई खिदमतगार बनण्याचे वेड आहे. त्याने कॅटला भारतीय भाषा आणि नृत्य शिकवण्यासाठी प्रशिक्षकांची सोय करून दिली आणि तिच्यासोबत दोन चित्रपटांत कामही केले. कतरिना मनोमन सलमानचे आभार मानत होती आणि 'नेकी कर और दरिया में डाल', यावर सलमानला विश्वास होता. हाच दर्या रणबीर कपूरच्या रूपाने हात पसरून उभा होता. दोघांनी प्रकाश झा यांच्या 'राजनीती' आणि राजकुमार संतोषी यांच्या 'अजब प्रेम की गजब कहानी'मध्ये काम केले आणि प्रेम नावाचा चमत्कार घडला.
   
  पुढे वाचा,  'ब्रेकअप' ही रचलेली कथा... 
 • Ranbir Kapoor And Katrina Kaif

  प्रियकर भारतीय चित्रपट उद्योगाच्या प्रथम कुटुंबातील युवा राजकुमार होता आणि प्रेयसी सिंड्रेला होती. गरीब असलेली सिंड्रेला सोन्याचा जादुई बूट घातलेल्या राजकुमारसोबत नृत्य करत होती, परंतु त्याला रात्री १२ वाजेपूर्वी घरी पोहोचायचे असते. या गोंधळामध्ये त्याचा एक बूट तिथेच राहतो. याच बुटाच्या आधारे राजकुमार आपल्या सिंड्रेलाचा शोध घेतो. सर्व परिकथांचा अंत सुखद होतो, परंतु आयुष्य परिकथेपेक्षा वेगळे असते. यामध्ये पंख नसलेल्या पऱ्या असतात आणि राजकुमार मांजा नसलेला पतंग असतो. दोघांची आकाशात भेट होते. पैज लागते आणि वास्तवातील चुंबकीय ताकद त्यांना जमिनीवर आणून आपटते. या कथेतील सिंड्रेला आपली तब्येत आणि परिस्थितीमुळे वास्तववादी आहे. ती याच पृथ्वीवरील मानव आहे, तर जन्मत: खानदानी प्रेमळ मनाचा राजकुमार स्टोरीटेलर आहे. किती लोक खुश आहेत आणि किती नाराज, हे जाणून घेण्यासाठी 'ब्रेकअप' ही त्यानेच रचलेली कथा असावी. 

Trending