(फाइल फोटोः हृतिक रोशन आणि सुझान खान)
हृतिक रोशन आणि सुझान यांच्या घटस्फोटावर आज (1 नोव्हेंबर) न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. सामंजस्याने घटस्फोट घेण्याच्या दोघांच्या निर्णयाला वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने मंजूरी दिली. या दोघांना दोन मुले असून हृहान आणि हृदान ही त्यांची नावे आहेत. मुलांचा ताबा कुणाकडे असेल, यावर न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही.
पती-पत्नीचे नाते तुटल्याने त्यांच्या अल्पवयीन मुलांवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. मुलं निरागस आणि निरपराध असतात आणि सर्वात मोठी शिक्षा त्यांनाच मिळते. राकेश रोशन
आपल्या नातवांपासून दूर राहण्याचे दु:ख कसे बरे सहन करू शकतील! दुसरीकडे राकेश यांचे सासरे निर्माते जे. ओमप्रकाश सध्या 86 वर्षांचे आहेत. तर सुझानच्या आई-वडिलांसाठीदेखील हा दु:खद प्रसंग आहे. यावरून दोघांमध्ये कुणी तिसरा आल्याने हे प्रकरण उद्भवल्याचा अंदाज येतो. परंतु कधीकधी दोघांमध्ये कुणी तिसरा नसतानाही पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो. काही वर्षांपूर्वी अनुपम खेर हेच म्हटले होते की, ते व किरण यांच्यामध्ये कुणी तिसरी व्यक्ती नसतानाही दुरावा वाढत होता. आपले मन हे एक न सुटणारे कोडेच म्हणावे लागेल.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, हृतिक-सुझानच्या घटस्फोटामागे कोणती कारणे असू शकतात...