Home | Parde Ke Pichhe | Shahrukh and Amir make Salman rejected movies blockbuster hit

हे 6 हिट चित्रपट धुडकावल्याचा सलमानला आजही पश्चाताप, शाहरुख-आमिर यांनी केले कॅश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 25, 2016, 04:06 PM IST

त्याने धुडकावलेले काही चित्रपट शाहरुख आणि आमिर यांनी केले. त्यांनी या चित्रपटांमध्ये जीव ओतला. हे चित्रपट ब्लॉकबस्टर हिट करुन दाखवले. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही सलमानने रिजेक्ट केलेल्या अशा सहा चित्रपटांची माहिती देणार आहोत.

 • Shahrukh and Amir make Salman rejected movies blockbuster hit
  मुंबई- बॉलिवूड अॅक्टर सलमान खान याने करिअरमध्ये अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण ऐकून आश्चर्य वाटेल, की सलमानने अनेक हिट चित्रपट धुडकावले देखील आहेत. त्याच्या काहीच फॅन्सला माहिती नसेल, की त्याने धुडकावलेले काही चित्रपट शाहरुख आणि आमिर यांनी केले. त्यांनी या चित्रपटांमध्ये जीव ओतला. हे चित्रपट ब्लॉकबस्टर हिट करुन दाखवले. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही सलमानने रिजेक्ट केलेल्या अशा सहा चित्रपटांची माहिती देणार आहोत.
  फिल्म - दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे
  रिलीज डेट - 19 ऑक्टोबर 1995
  स्टारकास्ट - शाहरुख खान, काजोल, अनुपम खेर, अमरीश पुरी, फरीदा जलाल, मंदिरा बेदी.
  यशराज बॅनरने 1995 मध्ये आणलेला ‘दिलवाले दुल्हनिया…’ यात राज मल्होत्रा याचा रोल आधी सलमानला ऑफर करण्यात आला होता. पण काही कारणांनी त्याने हा रोल करण्यास नकार दिला. त्यानंतर शाहरुखला हा रोल ऑफर करण्यात आला. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. विशेष म्हणजे सैफ अली खानलासुदधा हा रोल ऑफर करण्यात आला होता.
  पुढील स्लाईडवर वाचा... अशाच सहा चित्रपटांची नावे... सलमानने धुडकावले आहेत हे सहा चित्रपट...

 • Shahrukh and Amir make Salman rejected movies blockbuster hit
  फिल्म -गजनी
  रिलीज डेट - 25 दिसेंबर 2008
  स्टारकास्ट - आमिर खान, आसिन, जिया खान, प्रदीप रावत.
   
  आमिरने या चित्रपटाची स्क्रीप्ट वाचली. पण त्याला हा सलमान खानसाठी योग्य वाटला. त्याने सलमानचे नाव रेफर केले. पण त्याने हा रोल स्विकारला नाही. अखेर आमिरने तो केला. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
 • Shahrukh and Amir make Salman rejected movies blockbuster hit
  फिल्म - बाजीगर
  रिलीज डेट - 12 नोव्हेंबर 1993
  स्टारकास्ट - शाहरुख खान, काजोल, शिल्पा शेट्टी, जॉनी लीवर, राखी गुलजार.

  अब्बास-मस्तानची ही थ्रिलर मुव्ही निगेटिव्ह रोलवर आधारीत आहे. रोल निगेटिव्ह असल्याने सलमानने नकार दिला. पण शाहरुखने तो स्विकारुन चित्रपट हिट करुन दाखवला.
 • Shahrukh and Amir make Salman rejected movies blockbuster hit
  फिल्म -चक दे इंडिया
  रिलीज डेट - 10 ऑगस्त 2007
  स्टारकास्ट -शाहरुख खान, सगारिका घाटगे, विद्या मालवडे, चित्रांशी रावत, शिल्पा शुक्ला.
   
  आधी कबीर खान नावाच्या हॉकी प्रशिक्षकाचा रोल सलमानला ऑफर करण्यात आला होता. पण डेट्स जुळत नव्हत्या. अखेर सलमानने नकार दिला. शाहरुखची चांदी झाली.
 • Shahrukh and Amir make Salman rejected movies blockbuster hit
  फिल्म - जोश
  रिलीज डेट - 9 जुन 2000
  स्टारकास्ट - शाहरुख खान, ऐश्वर्या राय, चंद्रचूर सिंह, प्रिया गिल, शरद कपूर.
   
  मन्सूर खान यांनी डायरेक्ट केलेली ही मुव्ही आधी सलमानला देण्यात आली होती. पण डेट्समुळे त्याने नकार दिला. शाहरुखने मात्र या चित्रपटाला होकार दिला. यातील रोल ऐश्वर्याच्या भावाचा असल्याने सलमानने नकार दिल्याचाही अफवा होत्या.
 • Shahrukh and Amir make Salman rejected movies blockbuster hit
  फिल्म - कल हो न हो
  रिलीज डेट -28 नोव्हेंबर 2003
  स्टारकास्ट - शाहरुख खान, प्रीटी जिंटा, सैफ अली खान, जया बच्चन, रानी मुखर्जी.
   
  धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटातील सैफ अली खानचा रोल सलमानला ऑफर करण्यात आला होता. पण तेव्हा सलमान आणि शाहरुखमध्ये कोल्डवॉर सुरु होता. मला दुय्यम भूमिका दिल्याचा सलमानला राग आल्याने चित्रपट नाकारण्यात आला.

Trending