आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रीना रॉयशी तुलना झाल्याने भडकली होती सोनाक्षी सिन्हा, हे आहे कारण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूनम आणि रीना रॉयसोबत शत्रुघ्न सिन्हा. इन्सेटमध्ये सोनाक्षी. - Divya Marathi
पूनम आणि रीना रॉयसोबत शत्रुघ्न सिन्हा. इन्सेटमध्ये सोनाक्षी.
मुंबई- बॉलिवूडची दबंगगर्ल सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई पूनम सिन्हा एका कारणावरुन चांगल्याच चिडल्या होत्या. बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यावर अशी चर्चा सुरु झाली होती, की सोनाक्षीचा चेहरा अभिनेत्री रीना रॉयशी मिळता जुळता आहे. 80 च्या दशकात सीना रॉय बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती. यावेळी सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचे रीनासोबत अफेअर होते. पण काही कारणास्तव शत्रुघ्न यांनी माजी मिस यंग इंडिया पूनम चंडीरमानी यांच्याशी गुपचुप लग्न केले. त्यावरुन रीना प्रचंड चिडली होती. पण अखेर तिने समजूतीने काम घेतले.
पूनम यांनीही बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे
- पूनम यांनी ब्युटीकॉन्टेंस्ट जिंकून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.
- कोमल या नावाने त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. काही चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.
- पण एक दिवस असे वृत्त आले, की त्यांनी शत्रुघ्न सिन्हासोबत लग्न केले. आता त्या बॉलिवूडमध्ये काम करणार नाहीत.
- पूनम आणि शत्रुघ्न यांनी कोणताही चित्रपट सोबत केलेला नव्हता. त्यांच्या नावाची चर्चाही कधी झालेली नव्हती.
- त्यामुळे दोघांच्या लग्नाच्या बातमीने लोकांना चांगलाच धक्का बसला होता.
असे झाले होते पूनम चंडीरमानी यांच्याशी लग्न
- फिल्म इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतल्यानंतर शत्रुघ्न चित्रपटांमध्ये काम करत होते. तेव्हा त्यांना पूनम आवडली होती.
- त्यामुळे शत्रुघ्न यांचे मोठे बंधू राम सिन्हा पूनम यांच्या घरी स्थळ घेऊन गेले.
- पूनम यांची आई या स्थळाने चांगलीच चिडली. कुठे माझी फुलासारखी मुलगी आणि कुठे तो काळासावळा चोर, असे त्या म्हणाल्या होत्या.
- यावेळी शत्रुघ्न सिन्हा चोरांच्या भुमिका करत होते. नकार आल्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांच्याशी संपर्क साधला. भावना व्यक्त केल्या. अखेर दोघांचे लग्न झाले.
या लग्नाने रीनाला बसला होता धक्का
- हे लग्न झाले तेव्हा रीना रॉय चित्रपटाच्या कामानिमित्त लंडनला गेली होती. यावेळी दोघांचे अफेअर सुरु होते.
- लग्नाची माहिती समजल्यावर रीचा चांगलीच भडकली. ती लगेच भारतात आली.
- तिने शत्रुघ्न सिन्हा यांना याचा जाब विचारला होता.
- शत्रुघ्न आणि रीना यांच्या अफेअरली कल्पना होती, असे पूनम यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम यांचे लव्ह मोमेंट्स... लहानपणी अशी दिसायची सोनाक्षी सिन्हा... तिला आहेत दोन जुळे भाऊ.....
बातम्या आणखी आहेत...