Home | Parde Ke Pichhe | Suniel Shetty love story with Mana Kadri

सुनील शेट्टीच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण, पहिल्या नजरेत जडले होते यांच्यावर प्रेम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 26, 2016, 10:25 AM IST

त्याची लव्ह स्टोरी एका पेस्ट्री शॉपपासून सुरु झाली होती. येथे त्याने पहिल्यांदा मानाला बघितले होते. तिला जिवसंघिनी बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या.

 • Suniel Shetty love story with Mana Kadri
  मुंबई- सुनील शेट्टी उर्फ अण्णा आणि माना यांच्या लग्नाला आज (सोमवार) 25 वर्षे पूर्ण झाले. याच दिवशी 1991 मध्ये दोघांनी लग्न केले होते. फार कमी लोकांना माहिती आहे, की दाक्षिणात्य असलेल्या अण्णाने चक्क गुजराती मुलीसोबत लग्न केले आहे. तिचे नाव आधी माना कादरी होती. सुनील शेट्टीने अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या लव्ह स्टोरीबद्दल माहिती दिली आहे. त्याची लव्ह स्टोरी एका पेस्ट्री शॉपपासून सुरु झाली होती. येथे त्याने पहिल्यांदा मानाला बघितले होते. तिला जिवसंघिनी बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या.
  अण्णाने असे पटवले मानाला
  त्या काळी मोबाईल किंवा सोशल साईट्स नव्हत्या. एखाद्या मुलीशी ओळख करणे अत्यंत कठिण होते. मानाच्या बहिणीने दोघांची भेट घडवून आणली होती. संधी साधून सुनीलने मानाला प्रपोज केले होते. विशेष म्हणजे कोणतेही आढेवेढे न घेता मानानेही लग्नाला होकार दिला होता. त्यानंतर तब्बल 9 वर्षे दोघांमध्ये प्रेम बहरत होते. दोघांनी 1991 मध्ये लग्नाचा निर्णय घेतला. दोघांना आता दोन मुले आहेत. मुलगी अथिया आणि मुलगा अहान असे त्यांची नावे आहेत. अथियाने हिरो चित्रपटात डेब्यू केला आहे. अहान लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्र्री करणार असल्याचे सांगितले जात आहे.
  क्रिकेटसह किक बॉक्सिंग आहे अण्णाचे वेड
  माना मुंबईच्या वरळी भागात इंटेरिअर शोरुम चालवते. सुनील हॉटेल इंडस्ट्रीजकडे लक्ष देतो. यशस्वी अभिनेत्यासह तो यशस्वी बिझनेसमनही आहे. चित्रपटातील कलाकारांनी बॉलिवूड व्यतिरिक्त बिझनेस करण्याची सुरवात सुनीलने केली असे समजले जाते. क्रिकेटसह त्याला किक बॉक्सिंगचेही वेड आहे.
  पुढील स्लाईडवर बघा, सुनील शेट्टी याचे कुटुंबीयांसोबतचे रेअर पिक्स...

Trending