आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोनला राग का आला?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः दीपिका पदुकोन)

दीपिका पदुकोनबाबत एका राष्ट्रीय वृत्तपत्राच्या बॉलिवूड पानावर तिच्या छायाचित्राच्या खाली असे लिहिण्यात आले होते, ‘ओह माय गॉड, दीपिका क्लीवेज इज शोइंग.’ हे थट्टा करण्यासारखे वाक्य होते. वक्ष स्थळाचे असे हलकेसे ओझरते दर्शन होते, ज्याकडे रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाचे लक्षही जाणार नाही. जे भामटे मुलींकडे पाहत राहतात, ते तर सात पडद्यांमध्ये लपलेली मुलगीदेखील पाहतात. दीपिकाला ते वाक्य कदापि आवडलेले नाही. तिने याचा कडाडून विरोध केला आहे. तिने विरोध केला नसता तर त्या वाक्याकडे कोणाचेही लक्ष गेले नसते.
दीपिकाच्या विरोधानंतर सोनम कपूरचे असे म्हणणे आहे की, आपले शरीर झाकून ठेवले तर कोणीच टीका करत नाही. वस्तुत: सोनमला अनावश्यकरीत्या खूप बोलण्याची सवय आहे. करण जोहर निर्मित एका चित्रपटात सोनम कपूर धाडसी होती. तसेच ‘खूबसूरत’मध्ये ‘बम डोले’वर आपल्याच तोऱ्यात नाचली.
वृत्तपत्रातून सुरू झालेले हे ‘युद्ध’ ट्विटर आणि फेसबुकच्या पर्यायी विश्वात पोहोचले आहे. वृत्तपत्राकडूनही प्रतिहल्ले करण्यात आले. शाहरुख खान दीपिकाच्या बाजूने उभा राहिला. आणखी एखादा चांगला तमाशा उपलब्ध झाल्यामुळे हे अनावश्यक युद्ध अनेक पातळ्यांवर कायम आहे. अशाच प्रकारचे प्रकरण कुठेही होवो, सेन्सॉरच्या सैल होण्याच्या टप्प्यावर पोहोचते. नैतिकता आणि संस्कृतीच्या रक्षणाचा ठेका घेतलेले लोक अशाच प्रकारच्या संधीच्या शोधात असतात. तथापि, दीपिकाच्या या प्रतिक्रियेचे कारण तिचा मूड खराब असणेदेखील असू शकते. टिप्पणी चुकीची आणि अनुचित होती, हे खरे आहे. मात्र, दीपिकाला स्टार या नात्याने आनावश्यक टोमणे मारण्याची सवय असावी. सिनेताऱ्यांची बिघडलेली मने अशा प्रकारच्या क्रिया करत राहतात. चित्रपटाच्या सेटवरही डोकावले जाते. सामान्य जीवनातही महिला अशा प्रकारे डोकावणे सहन करतात. लोकल ट्रेन आणि गच्च भरलेल्या बसमध्येही अनोळखी लोकांकडून जाणून-बुजून झालेल्या स्पर्शाने आत्मा रक्तबंबाळ होतो. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’च्या सुरुवातीच्या भागाच्या प्रचारासाठी रचण्यात आलेले प्रोमो अत्यंत संवेदनशील संकेत देत आहेत. एका प्रोमोमध्ये बस कंडक्टर डोकावणाऱ्या एका प्रवाशाला म्हणतो की, ‘सत्यमेव जयते पाहायला विसरू नको.’ तो अप्रत्यक्षरीत्या डोकावणाऱ्यांना माहिती देत आहे. अशाच प्रकारे एका सरकारी कार्यालयात लाचेची मागणी करणाऱ्यालादेखील, ‘सत्यमेव जयते पाहायला विसरू नको’, असे म्हटले जाते. सारांश हा आहे की, सामाजिक मुद्द्यांवरील कार्यक्रमांचे प्रोमोदेखील अर्थपूर्ण आहेत. याचा एखादा भाग डोकावण्यावर असेल, असा अंदाज याद्वारे लावणे योग्य नाही.
सामाजिक दोष वेगवेगळे असतानाही त्यात एक साम्य आहे. सर्वांच्या मुळामध्ये निरक्षरता, अंधश्रद्धा आणि जीवन मू्ल्यांचा अभाव आहे. रोग शरीराच्या कोणत्याही भागामध्ये कसाही असो, संपूर्ण शरीरच सैल पडते. पॅन्क्रियाजच्या अभावामुळे मधुमेह झालेल्या रुग्णांच्या पायांमध्ये फोड येणे धोक्याची आगाऊ सूचना असते. समाजही अशाच प्रकारचे संकेत पाठवतो काय? सामाजाने पाठवलेल्या संकेतांकडे आपण कानाडोळा करतो काय? कशा प्रकारचा सिनेमा पाहिला जात आहे, हादेखील एक संकेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचे संकेत पशू-पक्षी माणसाच्याही आधी ओळखतात. दीपिका प्रकरण साधारण वाटते, पण मीडियाचे खळबळजनक होणेदेखील संकेत आहे आणि दीपिका पदुकोनच्या भडकण्याला सर्व महिलांच्या रागाचा संकेतही म्हटले जाऊ शकते. सामान्य जीवनात नेहमीच गंभीर राहता येत नाही. खट्याळपणा आणि हसणे-खिदळणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे डोकावणेसुद्धा केवळ खट्याळपणा असू शकतो.
ते छायाचित्र कदापि अश्लील नव्हते आणि शरीराचा कोणताच अवयव दिसतही नव्हता, याचेच कदाचित दीपिकाला वाइट वाटले असावे. मात्र, टिप्पणीमधील ‘ओह माय गॉड’ खूप मोठ्या गोष्टीचा संकेत देते. ती छायाचित्रावर नव्हे तर टिप्पणीवर नाराज आहे. हेदेखील शक्य आहे की, त्या वृत्तपत्राशी संबंधित काही पत्रकार दीपिकाच्या बाबतीत कधीतरी आक्रमक राहिले असावेत. हा छेडछाडीच्या दीर्घ परंपरेचा एक भाग आहे. सहनशीलतेचा बांध छोट्याशा गोष्टीनेदेखील तुटू शकतो. एखाद्या उंटावर खूप जास्त वजन लादण्यात आले आणि त्यावर गवताची एक काडी ठेवताच उंट खाली बसतो. सिनेपत्रकारितेची खालावत चाललेली पातळी सर्वच पाहत आहेत. जेव्हा कुणाकडेही सांगण्यासाठी ठोस काहीच नाही, तेव्हा तो ‘क्लीवेज’च पाहतो.