आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झी’ टीव्हीचे धाडसी पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील पहिले खासगी टीव्ही चॅनल ‘झी’ने आपले वरचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी पारंपरिक मसाल्यांसह काही नवे प्रयोग करण्याचे नेहमीच प्रयत्न केले आहेत. त्यांच्या इतर प्रतिस्पर्धी चॅनल्सचे मालक विदेशी आहेत, पण भारतीय मालक असलेले ‘झी’ एकमेव चॅनेल आहे. हे खरे आहे की, त्यांनी मालिका विश्वाची निर्बुद्धता आणि अंधर्शद्धांना मजबूत बनवणार्‍या रचना सादर केल्या, परंतु सोप ऑपेराच्या विणीतच सांस्कृतिक घाण आहे. त्यांच्या मराठी चॅनलवर चांगले कार्यक्रम होतात. 23 जून 2014 पासून ते ‘जिंदगी’ नामक उप चॅनलला सुरुवात करत असल्याचे वृत्त आहे. या चॅनलमध्ये पाकिस्तान, इराण, कोरिया इत्यादी बिगर युरोपियन देशातील यशस्वी कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाईल. आज मुंबईसारख्या अनेक महानगरांमध्ये सेव्हन स्टार नामक केबल नेटवर्कवर पाकिस्तानात तयार झालेल्या मालिका सातत्याने दाखवल्या जात असून गोंधळ माजवणार्‍यांच्या नजरेपासून आपल्या र्मयादित प्रसारणामुळे त्या अद्याप दूर आहेत.
पाकिस्तानचा चित्रपट उद्योग भारताच्या भव्य चित्रपट उद्योगासमोर ठेंगणा आहे. कारण चित्रपटगृहांची संख्या कमी असून त्यांची स्थितीही चांगली नाही. पाकिस्तानी प्रेक्षकांचे सिनेतार्‍यांसाठीचे खूळ कदाचित भारतापेक्षाही जास्त आहे. तसेच दुबईहून आलेल्या अवैध डीव्हीडीचा व्यवसायही तिथे तेजीत आहे. त्यांच्या सर्वात महागड्या चित्रपटाचे बजेट भारतातील एका कॅमेरामनच्या मानधनाएवढे असते. तसेच भारतातील प्रादेशिक चित्रपटांपेक्षाही त्यांचे बजेट खूप कमी आहे. पाकिस्तानचे टीव्ही माध्यम आपल्या कथांमुळे भारतापेक्षा अनेक पटींनी सरस आहे. वस्तुत: सुरुवातीपासूनच पाकिस्तानचे प्रतिभावंत लेखक आणि शिकलेले लोक तेथील टीव्ही माध्यमाशी जुळलेले आहेत. भारतीय मालिकाविश्वाने जाणकारांना नेहमीच आपल्यापासून दूर ठेवले आहे. तसेच आपल्या निबरुद्धपणाच्या साम्राज्याच्या चहूबाजूंनी मजबूत भिंती उभ्या केल्या आहेत. कधी-कधी काही भगदाड पडतात. याउलट भारतीय दूरदर्शनला श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, रमेश सिप्पी इत्यादी चिकटून राहिले, परंतु सरकारने स्वत: आपल्या या मजबूत संस्थेला कमकुवत बनवले आहे. कदाचित भांडवलवादी चॅनल्सनी राजकीय क्षेत्रात आपल्या प्रभावाचा वापर करत सर्वात व्यापक पोहोच असलेल्या या माध्यमाला कुचकामी ठरवले असावे.
असो, ‘सेव्हन स्टार’ केबल नेटवर्कवर आजकाल पाकिस्तानी मालिका ‘मोरा पिया’ दाखवली जात आहे. लहानपणीच्या दोन वेगळ्या स्वभावाच्या मित्रांची मुले (मुलगा-मुलगी) लहानपणापासूनच खेळता-खेळता मोठे झाले आणि तारुण्यात प्रेमी बनले, हा या मालिकेच्या कथेचा सार आहे. नायक एका टीव्ही चॅनलवर भ्रष्टाचाराविरोधात चालवत असलेल्या मोहिमेला मुलीच्या वडिलांचा विरोध असतो. बिल्डर माफियांकडून त्याला सतत धमक्या येत आहेत आणि त्याचा जवळचा सहकारी गंभीर जखमी होऊन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. नायक एका रात्री भरपावसात मुलीच्या वडिलांच्या घरात शिरतो आणि विचारतो की, सेवानिवृत्त सरकारी अधिकार्‍याचे तुम्हाला संरक्षण आहे, परंतु तुम्ही किंवा इतर व्यक्ती खरेच सुरक्षित आहात का? नंतर दोघांचे लग्न केले जाते. मधुचंद्रादरम्यान नायकाला आपल्या सहकार्‍याचा मृत्यू झाल्याची बातमी कळते तेव्हा तो तत्काळ जाण्याची तयारी करतो व पत्नीदेखील त्याच्यासोबत जाते. रस्त्यात माफिया दोघांनाही उचलून नेतात. पतीला बांधून त्याच्या पत्नीवर बलात्कार करतात आणि नंतर त्यांना सोडून देतात.
दोघे पती-पत्नी ही घटना आपल्या कुटुंबीयांपासून लपवत त्यांना या ट्रॅजेडीपासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच सर्वकाही विसरून आनंदी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करण्याचा निश्चय करतात. मात्र, दोघांना ती घटना सतत आठवत असते. अशातच पत्नी जेव्हा गरोदर होते तेव्हा दोन्ही कुटुंबीयांमध्ये जल्लोष साजरा केला जातो. मात्र, दोघांमध्ये अद्याप शारीरिक संबंध तयार झालेले नव्हते. तथापि, हा मुलगा कोणाचा आहे, हे त्यांना माहीत असते, परंतु तरीही ते कुटुंबीयांच्या आनंदात इच्छा नसतानाही सहभागी होतात. पती-पत्नी तीनवेळा गर्भपात करण्यासाठी जातात, पण काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. आता द्वंद्व हे आहे की, 6 महिने झाल्यामुळे गर्भपात होऊ शकत नाही. पत्नीचे म्हणणे आहे की, गर्भातील बाळ तिचे असल्यामुळे ती त्याचा सांभाळ करेल. कारण गर्भातील बाळ निष्पाप आहे. मात्र, पती आपल्या पुरुषी विचारधारेमुळे आईचे मन समजू शकत नाही. त्यामुळे दोघांनाही नरकात राहिल्यासारखे वाटते. पत्नीमध्ये ममता जागृत होणे स्वाभाविक आहे, परंतु पुरुषी अहंकाराने तुडवलेला साप वारंवार फणा काढतो. नायक माफियांचा शोध घेतो आणि एका प्रामाणिक पोलिस आयुक्तांच्या मदतीने त्यांचा सफाया करण्यात यशस्वी ठरतो.
योग्य वेळी मुलाचा जन्म होतो आणि ‘वडिलां’व्यतिरिक्त सर्वजण त्याच्यावर प्रेम करतात. घटनाक्रम असा होतो की, फक्त नायकाच्या वडिलांना सत्य माहीत होते आणि आपल्या निरागस नातवाला ते बोर्डिंगमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतात, पण मुलाच्या आईने यास होकार द्यावा, अशी ते अट ठेवतात. यावर घटस्फोट हाच पर्याय आहे, हे तिला माहीत असते. आपल्या प्रेमाला एक संधी देण्यासाठी ती हृदयावर दगड ठेवून मुलाला बोर्डिंगला पाठवण्यास परवानगी देते. तिचा हा त्याग तिच्या पतीच्या हृदयावरील त्या घटनेचा खडक फोडतो आणि तो शाळेत जाऊन मुलासह कुटुंबात परततो. या मालिकेत कमालीच्या मानवी संवेदना आहेत. तसेच सर्व द्वंद्व असा तणाव बनवतात की, प्रेक्षकांचा थरकाप उठतो.
या पाकिस्तानी मालिकेतील भ्रष्टाचार आणि अंधर्शद्धा भारतासाठी नवीन नाही. या दोन्ही देशातील जनतेचे हृदय एकाच तालावर धडकते. ममता ही जगाची सर्वात सशक्त बाजू आहे. आपले मालिका विश्व पर्यायी जग आहे आणि हेच वास्तव आहे. ‘जिंदगी’ चॅनलने धाडसी मालिका प्रसारित कराव्यात, हीच अपेक्षा.