आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दावत-ए-इश्क'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दावत-ए-इश्क' हा विविध धर्माच्या तरुण-तरुणीच्या लव्हस्टोरीवर बेतलेला सिनेमा आहे. सिनेमात परिणीती चोप्रा आणि आदित्य राय कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. आदित्य लखनऊच्या तरुणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. परिणीती एका चप्पल व्यापा-याची मुलगी आहे, ती हुंड्याच्या विरोधात जाऊन स्वत:चे लग्न मोडते. तसेच, आदित्य एक आचारी असून तो बिर्याणी आणि कबाबने सर्वांना आकर्षित करतो.
सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलेला आहे. सिनेमात लखनऊ आणि हैदराबाद दोन्ही शहराची झलक पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा हबीब फैजल दिग्दर्शित करत असून आदित्य चोप्रा निर्माता करत आहे. आदित्य, परिणीतीव्यतिरिक्त सिनेमा अनुपम खेर आणि करण वाही यांच्याही भूमिका आहेत.