आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेट स्टोरी 2

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हेट स्टोरी 2' या सिनेमात सुरवीन चावला, जय भानूशाली आणि सुशांत सिंह मेन लीडमध्ये आहेत. विशाल पंड्या या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. सिनेमा त्याच्या बोल्ड विषयामुळे रिलीजपूर्वी चर्चेत आहे. या सिनेमातील काही गाणी आणि प्रोमोमधील काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर ती गाणी आणि सीन्स सिनेमातून वगळण्यात आले.
या सिनेमाद्वारे जय भानूशाली बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर सुरवीन यापूर्वी 2011 मध्ये 'हम तुम शबाना' (कॅमियो) आणि 2012मध्ये 'हिम्मतवाला' (स्पेशल अपीअरन्स)मध्ये झळकली होती. लीड अॅक्ट्रेस म्हणून सुरवीनचा हा पहिलाच सिनेमा आहे.
सिनेमात मेन लीड साकारणारे जय भानूशाली आणि सुरवीन चावला हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नावे आहेत. जयने एकता कपूरच्या कयामत या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तर सुरवीन एकताच्या 'कहीं तो होगा', 'कसौटी जिंदगी की', 'काजल' या मालिकांमध्ये झळकली आहे. याशिवाय 'एक खिलाडी एक हसीना' आणि 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार' या शोजमध्येही तिने काम केले आहे.