आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्डर 3

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मर्डर' आणि 'मर्डर 2'च्या यशानंतर भट्ट कॅम्प 'मर्डर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या सिनेमात इमरान हाश्मीच्या ऐवजी रणदीप हुड्डाची वर्णी सिनेमात लागली आहे.
मुकेश भट्ट यांचा मुलगा विशेष भट्टने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सिनेमाची कहाणी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर विक्रम (रणदीप हुड्डा)च्या भोवती गुंफण्यात आली आहे. विक्रमला स्त्रियांचे आकर्षण असते. एकेदिवशी निशा (सारा लॉरेन)ची भेट विक्रमशी होते. त्याला बघताच क्षणी ती त्याच्या प्रेमात पडते.
विक्रम तिला शहराबाहेर असलेल्या आपल्या घरी घेऊन जातो. या घरात प्रवेश करताच निशाचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. घरात तिच्यासोबत विचित्र घटना घडू लागतात.
तर दुसरीकडे विक्रम आपल्या एक्स गर्लफ्रेंड रोशनीच्या (अदिती राव हैदरी) शोधात आहे. रोशनी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली आहे.
आता विक्रम रोशनीचा शोध घेण्यात यशस्वी होणार का ? निशाला घरातील रहस्य ठाऊक होतील का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 'मर्डर 3' या सिनेमात प्रेक्षकांना मिळतील.