आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक थी डायन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'एक थी डायन' हा सिनेमा मुकुल शर्मा लिखित एका लघुकथेवर आधारित आहे. विशाल भारद्वाजने या लघुकथेला सिनेमाच्या रुपात सादर केले आहे. हा रोमँटिक थ्रिलर धाटणीचा सिनेमा असून बोबो नावाच्या भारतातील प्रसिद्ध जादुगराभोवती याचे कथानक गुंफण्यात आले आहे. बोबोच्या मनात विचित्र उलथापालथ सुरु असते. याबद्दल तो त्याची गर्लफ्रेंड तमारालासुद्धा सांगतो. मतिभ्रम झाल्यामुळे अखेर सायकॅट्रिककडे जाण्यावाचून त्याच्याकडे पर्याय उरत नाही.

संमोहन शास्त्राद्वारे त्याच्या भूतकाळात जाण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा त्याच्या बालपणी घडलेले एक भयानक वास्तव समोर येतं. एका डायनने त्याच्या कुटुंबाला उद्धवस्त केले असते. बोबोलासुद्धा सुखात राहू देणार नाही, अशी धमकी त्या डायनने दिली असते.

बोबो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा बोबोचे करिअर यशोशिखरावर पोहोचतं, तेव्हा त्याच्या आयुष्यात लिसा दत्ता नावाची स्त्री येते. तीच डायन असल्याचे बोबोला वाटतं. मात्र खरंच ती डायन असते का ? की बोबोच्या मनात निर्माण झालेला हा संशय आहे ? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 'एक थी डायन' हा सिनेमा बघावा लागणार आहे.

या सिनेमात इमरान हाश्मी, हुमा कुरैशी, कल्की कोचलिन आणि कोंकणा सेन शर्मा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 18 एप्रिलला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.