आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमसूत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'प्रेमसूत्र' या सिनेमाची कहाणी लग्नापेक्षा करिअरला अधिक महत्व देणा-या आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणा-या तरुण-तरुणीभोवती गुंफण्यात आली आहे.

सानिया ही एक तरुण मुलगी असून परंपरा जपणा-या कॅथलिक घराण्यात जन्माला आली आहे. गोव्यात राहणा-या या सानियाला निसर्ग आणि मुक्तपणा विलक्षण आवडतो. तिचे अजाणपण, गावंढळपणा, निरागसता या गोष्टी तिला अधिकच भाबडी बनवतात. तिने लग्न करावे असे तिची आई तिला सतत ऐकवत असते. मात्र सानियाला लग्नात रस नसतो. आनंद हा अगदी शहरी वातावरणात वाढलेला आणि कॉर्पोरेट जगात वावरणारा तरुण आहे. संवेदनशील स्वभाव असला तरीही बिझनेसच्या चाकोरीबद्ध चौकटीत तो अडकतो. गोव्यातल्या एका खाणीवर मॅनेजर म्हणून त्याला नेमले जाते. गोव्यातच दोघांची योगायोगाने गाठ पडते. सानियाचा मोकळा स्वभाव पाहून आनंद हुरळून जातो. प्रेम, लग्न आणि शरीरसंबंध याबद्दल तिच्या अत्यंत स्पष्ट कल्पना असल्याचे पाहून तो तिच्यावर भाळतो. आनंद आणि सानिया यांच्यात पुढे काय होते ते प्रत्यक्ष पडद्यावर 'प्रेमसूत्र'मध्येच पाहायला हवे.

संदीप कुलकर्णी आणि पल्लवी सुभाष या सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहेत. तर श्रुती मराठे, लोकेश गुप्ते, शिशीर शर्मा, ईला भाटे, शुभा खोटे, प्रसाद पंडित, या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. तेजस विजय देऊस्कर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

गोव्याची पार्श्वभूमी लाभलेला आणि प्रेमकथेवर आधारित 'प्रेमसूत्र' हा सिनेमा येत्या 21 जूनला थिएटरमध्ये दाखल होतोय.