आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशरम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता रणबीर कपूरचा 'बेशरम' हा आगामी सिनेमा आहे. अभिनव कश्यप दिग्दर्शित या सिनेमात रणबीरने बबली नावाच्या तरुणाची भूमिका साकारली आहे. हा तरुण दिल्लीतील एका अनाथाश्रमात राहतो.
बबली व्यवसायाने एक स्ट्रिट स्मार्ट कार मेकॅनिक आहे. तो मनाने खूप चांगला आहे. हसमुख बबली आयुष्य जगण्याची पुरेपुर मजा लुटत असतो. मात्र कधीकधी चांगल्या मार्गावर जाण्यासाठी वाईट मार्गाचा अवलंब करतो.
अस वागताना तो एकेदिवशी त्याची प्रेयसी ताराचे मन दुखावतो आणि त्यानंतर त्याला उमजतं की तो चुकीचा का वागला. त्यानंतर तो स्वतःला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र या प्रयत्नात बबलीला यश मिळणार का ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला रणबीरचा बेशरम हा सिनेमा बघावा लागणार आहे.