आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movie Preview Of Marathi Upcoming Film Bol Baby Bol

बोल बेबी बोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ए. वी. आर. एन्टरटेन्मेंट'चे विरल मोटानी प्रस्तुत, 'मॅजेस्टिक एन्टरटेन्मेंट'चे बलराज इराणी निर्मित, 'बोल बेबी बोल' सिनेमात अरुणा इराणी यांच्यासह मकरंद अनासपुरे, अनिकेत विश्वासराव, नेहा पेंडसे, सिया पाटील, चतुरा मोट्टा, दुर्गेश आकेरकर, मुकेश जाधव, अर्चना गावडे, सुरेश सावंत, पीटर एरोल, दिप्ती प्रकाश, विजय चव्हाण, संतोष मयेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत.
अरुणा इराणी यांनी या सिनेमात दुर्गादेवी या घरंदाज स्त्रीची महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटाची कथा राजन अग्रवाल यांनी लिहिली असून पटकथा राजन अग्रवाल, स्व. विनय लाड, संजय बेलोसे यांची तर संवाद संजय बेलोसे यांनी लिहिलेत. विवेक आपटे लिखित यातील गीतांना निशिकांत सदाफुले यांनी संगीत दिलं असून आनंद शिंदे, वैशाली सामंत, संजीवनी भेलांडे, अमृता नातु, रेश्मा, राहुल सक्सेना या गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. समीर आठल्ये यांनी 'बोल बेबी बोल' चे छायांकन केले असून कला दिग्दर्शन इजाज शेख, रवी यांनी केले आहे.
'बोल बेबी बोल'मधील दुर्गादेवीची कुटुंबवत्सल, शिस्तप्रिय व तितकीच कडक व्यक्तिरेखा साकारायला अरुणा इराणी यांनी मराठीसाठी खूप मेहनत घेतली आहे. 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्या मराठीत पुनरागमन करीत असल्याने त्यांच्या भूमिकेविषयीचे कुतूहल निश्चितच वाढले आहे. येत्या 7 नोव्हेंबरला 'बोल बेबी बोल' हा धमाल विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.