आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅपेचिनो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाईफ इज लाईक 'कॅपेचिनो' याभोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले आहे. कॉफी बनविण्यासाठी ज्याप्रमाणे दूध, साखर, पाणी, कॉफी या गोष्टींचे योग्य प्रमाण जसे गरजेचे असते त्याचप्रमाणे आपले आयुष्य सुद्धा सुख, दुःख, राग, नैराश्य अशा अनेक भावनांनी भरलेले असते. एकंदरीतच लाईफ इज लाईक 'कॅपेचिनो' भोवती या सिनेमाचे कथानक गुंफण्यात असून कॉमेडी आणि तितकाच रोमॅंटिक असा हा सिनेमा आहे.
'कॅपेचिनो' सिनेमाच्या निमित्ताने शिव कदम यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले असून या सिनेमासाठी त्यांनी कथा, पटकथा, संवाद, गीतकार, दिग्दर्शन अशा पाचही भूमिका त्यांनी सांभाळल्या आहेत.सिनेमाच्या नावात जसे वेगळेपण आहे त्याचप्रमाणे सिनेमातील गाणी ही वेगळ्या बाजाची आहेत. या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत प्रथमच एक वेगळा प्रयोग करण्यात आला असून गायिका शिखा अजमेरा हिच्या आवाजात "अलीफिया अलीफिया" हे एक अरेबिक स्टाईलचे म्युझिक असलेले गीत रेकॉर्ड करण्यात आले असून अभिनेत्री मानसी नाईक आणि अभिनेता संजय नार्वेकर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे ही या सिनेमाची विशेष बाब आहे. ह्या शिव कदम आणि विश्वजित यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार अविनाश विश्वजित या तरुण जोडीने हटके म्युझिक दिले आहे.
संतोष देशपांडे यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात जितेंद्र जोशी, संजय नार्वेकर, मानसी नाईक, वर्षा उसगांवकर, मोहन जोशी, डॉ. गिरिश ओक, अनुजा साठे गोखले, विजू खोटे अशी तगडी स्टार मंडळी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. असा हा 'एन ऐजलेस रॉमेडी' असलेला 'कॅपेचिनो' हा सिनेमा येत्या २५ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.