आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेन्नई एक्स्प्रेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'चेन्नई एक्स्प्रेस'ची कहाणी आहे राहुल (शाहरुख खान) नावाच्या तरुणाची. राहुल उत्तर भारतीय असून मुंबईत आपल्या आजोबांबरोबर राहतो. तो आपल्या आजोबांचा लाडका असून त्याचेही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आजोबांची काळजी घेण्यासाठी तो लग्न करत नाही.
एक दिवस राहुलच्या आजोबांचा मृत्यू होता. मृत्यूनंतर आपलं अस्थिविसर्जन रामेश्वरममध्ये व्हावं अशी राहुलच्या आजोबांची शेवटची इच्छा असते. राहुल त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करायची ठरवतो. तो रेल्वेने आपला रामेश्वरमचा प्रवास सुरु करतो. आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचवण्याबरोबरच या रेल्वेतच आपल्याला आपले प्रेम गवसेल, यापासून तो अनभिज्ञ आहे.
या प्रवासात त्याची भेट दक्षिण भारतीय तरुणी मीना (दीपिका पदुकोण) बरोबर होते. तिला प्रेमाने मीनाम्मा म्हणून हाक मारतात. मीना कोम्बन नावाच्या गावात राहते. तिथे तिचे खूप मोठं कुटुंब आहे. तिनं बालपणीच आपल्या आईला गमावलं आहे.
मीनाचे वडील दुर्गेश्वरा अजहागुसुंदरम (सत्यराज) यांचं गावात मोठं नाव आहे. दुर्गेश्वरा यांचा आपल्या मुलीवर खूप जीव आहे. शेजारच्या गावात राहणारा तांगाबल्ली (निकितिन धीर) नावाच्या तरुणाचे मीनावर प्रेम आहे.
मीना आणि राहुलची भेट होते. हळूहळू हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र या दोघांचे मिलन सहजसोपे नाहीये. दोघांची संस्कृती भिन्न आहे. मात्र राहुल अपयशी होणा-यांपैकी नाहीये. राहुल हे आव्हान स्वीकारतो. त्याला ठाऊक आहेत्याने स्वीकारलेले आव्हान सोपे नाहीये. नवीन लोक, नवीन वातावरण, नवीन भाषा जी त्याला मुळीच ठाऊक नाही. अशा वातावरणात त्याला स्वतःला सामावून घ्यायचे आहे. आता राहुलला त्याच्या या प्रयत्नात यश मिळतं का हे आपल्याला रोमँटिक अ‍ॅक्शन सिनेमात रोहित शेट्टी स्टाईलने बघायला मिळणार आहे.