आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'क्रिएचर 3D\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'क्रिएचर 3D' हा विक्रम भट्ट यांचा 3D मॉनस्टार सायन्स फिक्शन सिनेमा आहे. सिनेमामध्ये बिपाशा बसु आणि पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बासची मुख्य भूमिका आहे. हा भारतातील पहिला मॉनस्टार सिनेमा असून 'जुरासिक पार्क' आणि 'प्रीडेटर'वर तयार करण्यात आला आहे. हा सिनेमा अनेक वैशिष्टपूर्ण आहे.
भारतीय 3D सिनेमांना पुढे नेण्यास या 'क्रिएटर 3D'ची मदत होऊ शकते. मात्र हॉलिवूडच्या 3D सिनेमांमधील भयानक स्टंट आणि साउंड इफेक्ट बघितलेल्या भारतीय प्रेक्षकांच्या मनात या सिनेमाविषयी उत्सूकता निर्माण करण्याचे काम आव्हानात्मक ठरणार आहे.
प्रत्येक आठवड्यात हॉलिवूडचे तंत्रज्ञानपूर्ण उत्कृष्ट सिनेमे प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यामुळे 'क्रिएचर 3D' या सिनेमात भारतीय तंत्रज्ञान वापरण्यात आले असल्याने यापासून प्रेक्षक दूरावण्याची शक्यता जास्त आहे.
सिनेमाच्या कलाकारांविषयी सांगायचे झाले, तर नायक इमरान अब्बासचा बॉलिवूड पदार्पणाचा सिनेमा आहे, तसेच बिपाशाच्या घसरत्या करिअरसाठी हा सिनेमा आधार बनू शकतो.