आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी गँग्स ऑफ मुंबई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक विल्फ्रेड लोगो आणि राजीव रंजन दास यांनी अंडरवर्ल्ड विश्वातील थरार, मुंबईतील दाऊदचे नेटवर्क आणि त्याच्या आयुष्यातील काही भाग पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर चित्रीत केला आहे. सिनेमाला मुंबईची पार्श्वभूमी आहे.
'डी गँग्स ऑफ मुंबई' या सिनेमाचा फस्ट लूक अलीकडेच रिलीज झालेल्या 'डी डे' या सिनेमाशी साधर्म्य साधणारा आहे. डी कंपनीचा मुख्य दाऊदने नेहमीच दिग्दर्शकांना आकर्षित केले आहे. अनेक निर्माता-दिग्दर्शकांना त्याचे आयुष्य मोठ्या पडद्यावर चित्रीत करण्याचा मोह आवरता आलेला नाहीये.
संजय कपूर, आर्या बब्बर, महिमा चौधरी, ओम पुरी, सुशील सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. येत्या 1 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.