आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाइंडिंग फॅनी फर्नांडिस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'फाइंडिंग फॅनी फर्नांडिस' हा एक कॉमेडी-ड्रामा सिनेमा आहे. सिनेमात दिपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोन्ही स्टार्स व्यतिरिक्त नसीरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया आणि पंकज कपूरसुध्दा महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा सिनेमा गोव्याच्या रोड जर्नीवर आधारित आहे. या जर्नीवर पाच पात्र आधारित आहेत. हे लोक एका वयस्कर पोस्टमनचे बालपणीचे प्रेम स्टेफनी फॅनी फर्नांडिसला शोधायला निघतात. मात्र त्यातील कोणालाच ठाऊक नाहिये, की स्टेफनी जिवंत आहे, की नाही. सिनेमाची कहानी याच संकल्पनेच्या अवती-भोवती गुंफलेली आहे.
सिनेमाचे दिग्दर्शन होमी अदजानियाने केले आहे. होमीने या सिनेमापूर्वी 2012मध्ये आलेल्या 'कॉकटेल'चे दिग्दर्शन केले होते. सैफ अली खान आणि दिनेश विजान यांनी मिळून हा सिनेमा निर्मित केला आहे. सिनेमाची शुटिंग नुकतीच पूर्ण झाली आहे. शुटिंग संपताच दिग्दर्शक होमीने एक जंगी पार्टी दिली. अर्जुन कपूर आणि दिपिका पदुकोण अभिनीत हा सिनेमा 4 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.