आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फग्ली'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'फग्ली' दिग्दर्शन कबीर सदानंद करत आहे. अक्षय कुमार आणि अश्विनी यार्डीने मिळून त्याची निर्मिती केली आहे.
सिनेमात दिल्लीचे चार मित्र देव, देवी, गौरव आणि आदित्य यांची कहानी दाखवली आहे. हे चार मित्र कॉलेज पूर्ण केल्यानंतर स्वप्नांना नवीन कलाटणी देऊ इच्छिता. परंतु त्याच्यासोबत असे काही घडते, की त्याविषयी ते स्वप्नातही विचार करत नाहीत.
या सिनेमात जिमी शेरगिल आणि बॉक्स विजेंदर मुख्य भूमिकेत आहेत. जिमी पोलिसाच्या भूमिकेत असून त्याच्या पात्राचे नाव एसएचओ चौटाला आहे. एसएचओ चौटाला आणि चार मित्रांमध्ये काय घडते आणि त्या समस्येतून ते कसे बाहेर पडतात. यातच 'फग्ली'ची कहानी गुंफलेली आहे.
'फग्ली'मध्ये विजेंदर आणि जिमी शेरगिल व्यतिरिक्त मोहित मारवाह, कायरा अडवाणी आणि अर्फी लांबासुध्दा दिसणार आहेत. कबीर सदानंद दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा 13 जून रोजी रिलीज होणार आहे.