आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोविंदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गेल्या काही वर्षांत दहीहंडी उत्सवाचे रुप बदलले आहे. उत्सवाच्या आडून केले जाणारे शक्तीप्रदर्शन उंच थराच्या बक्षिसासाठी राजकीय पथांची सुरु असलेली चढाओढ, या सगळ्यात दहीहंडी फोडणा-या मंडळांची सुरु असलेली रस्सीखेच, यावर भाष्य करणारा 'गोविंदा' हा मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे छोट्या पडद्यावरील 'श्रीकृष्ण' या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता स्वप्नील जोशी या सिनेमात गोविंदाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. 'श्रीकृष्ण' मालिकेत स्वप्नीलने साकारलेला कृष्ण कमालीचा गाजला होता. नटखट, माखनचोरसारख्या उपाध्यांनी गाजलेला स्वप्नीलचा कन्हैया आता मोठ्या पडद्यावर गोविंदाच्या व्यक्तिरेखेत रंग भरणार आहे.

आत्माराम धर्णे दिग्दर्शित या सिनेमात स्वप्नील जोशीसह गिरीजा जोशी, अरुण नलावडे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

एकंदरीतच दहीहंडी फोडणा-या गोविंदाचा थरार आणि त्यासाठी त्यांना करावी लागणारी कसरत या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.