आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाब गँग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौमिक सेन दिग्दर्शित आगामी गुलाब गँग या सिनेमात बी टाऊनच्या दोन दिग्गज अभिनेत्री एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. या दोन अभिनेत्रींची नावे म्हणजे माधुरी दीक्षित आणि जुही चावला ही आहेत. या सिनेमाच्या माध्यमातूनमाधुरी आणि जुही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. अनुभव सिन्हा आणि अभिनय देव या सिनेमाचे निर्माते आहेत.
'गुलाब गँग' अशा महिलांच्या समुहाची कथा आहे, जो गुलाबी रंगाची साडी परिधान करुन समाजात होणा-या अत्याचाराविरोधात लढा पुकारतो. बुंदेलखंड आणि मध्य प्रदेशच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा आहे. संपत लाल देवी यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र निर्मात्यांनी ही गोष्ट नाकारली आहे.
माधुरीने या सिनेमात स्त्रियांसाठी लढा देणा-या महिलेची भूमिका साकारली आहे, तर जुही महिला राजकारणीच्या रुपात झळकणार आहे. आता माधुरी आणि जुहीचा हा सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यात यशस्वी होतो का हे 7 मार्चला स्पष्ट होणार आहे.