आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाल भारव्दाज दिग्दर्शित 'हैदर' हा एक ड्रामा आहे. विशालने या सिनेमापूर्वी 'मटरू की बिजली की मंडोला', 'सात खून माफ', 'कमीने'सह अनेक सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.
विशाल यांच्या या सिनेमात शाहिद कपूर आणि श्रध्दा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. दोन्ही स्टार्सव्यतिरिक्त तब्बू, के के मेनन आणि इरफान खानसुध्दा महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. 'हैदर' हा सिनेमा शेक्सपिअरच्या 'हॅमलेट'वर बेतलेला आहे.
'हैदर' एक ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी आहे. त्याच्या बॅकराउंडमध्ये आजचे कश्मिर दाखवण्यात आले आहे. विशाल यांच्या या सिनेमामध्ये सर्वाधिक सीन काश्मिरचे आहेत. तसेच सिनेमा शाहिद कपूर, श्रध्दा कपूर आणि तब्बू तिघेही काश्मिरच्या रहिवाशांच्या भूमिकात दिसणार आहेत.
'हैदर'मध्ये शाहिद कपूर खूप वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. त्याने या सिनेमासाठी टक्कल केले आहे. सिनेमात विशाल भारव्दाज यांचे संगीत असून शाहिदने निर्मितीस मदत केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे.