आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movie Preview: Holiday: A Soldier Is Never Off Duty

\'हॉलिडे\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हॉलिडे' सिनेमासह अक्षय कुमार पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात तो एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'हॉलिडे' सिनेमात एका सैनिकाला कधीच सुट्टी मिळत नसल्याची कहानी आहे. हा सिनेमा 2012मध्ये आलेल्या तामिळ ब्लॉकब्लस्टर 'थुप्पकी' सिनेमाचा रिमेक आहे.
'हॉलिडे'चे ए.आर. मुरुगादास दिग्दर्शित करत आहेत. मुरुगादास यांनी 'गजनी' (2008) हा सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 'हॉलिडे'चा ट्रेलर खूप दिवसांपूर्वीच आला आहे. अक्षयचे चाहते आणि प्रेक्षक सिनेमातील सर्व सीन्स बघून खूप आनंदी होतील.
सिनेमाचा नायक एक सैनिक असल्याने देशभक्तीसुध्दा तुम्हाला बघायला मिळणार आहे. 'हॉलिडे'मध्ये अक्षय कुमारसह सोनाक्षी सिन्हाला कास्ट करण्यात आले आहे. या सिनेमात दोघेही स्टार्स रोमान्स करताना दिसणार आहेत. सिनेमातील खलनायकाचे अक्षय कुमारशी शत्रुत्व असल्याचे दाखवले आहे. सिनेमात अनेक आश्चर्यचकित करणारे सीन्स आहेत.
मुरुगादास फॉर्मुलाबध्द सिनमांमध्ये टिवस्ट देण्यासाठी ओळखले जातात. म्हणून 'हॉलिडे'मध्ये आणखी काही नवीन पाहायला मिळू शकते. अक्षय-सोनाक्षी व्यतिरिक्त सिनेमाच गोविंदा आणि सुमित राधवनसुध्दा आहेत. प्रीतमचे सिनेमाला संगीत असून टि्वंकल खन्ना आणि विपुल शाहने मिळून 'हॉलिडे' निर्मित केले आहे.
'हॉलिडे' 6 जून रोजी रिलीज होणार असून अजय देवगणचा 'अ‍ॅक्शन-जॅक्सन'सुध्दा याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.