आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हम्पटी शर्मा की दुल्हनिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हम्पटी शर्मा की दुल्हनिया' हा रोमँटिक कॉमेडी धाटणीचा सिनेमा आहे. या सिनेमात 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमात झळकलेली वरुण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. करण जोहर या सिनेमाचा निर्माता आहे. या सिनेमात वरुण हम्पटी हे पात्र साकारत आहे.
'हम्पटी शर्मा की दुल्हनिया' हा वरुणचा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमापूर्वी त्याचा 'मैं तेरा हीरो' हा सिनेमा रिलीज झाला होता. वरुणचे वडील डेविड धवन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. तर आलियाच्या करिअरमधील हा चौथा सिनेमा आहे. यावर्षी आलियाचे 'हायवे' आणि '2 स्टेट्स' हे सिनेमे रिलीज झाले होते.
शशांक खेतान दिग्दर्शित 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया'मध्ये वरुण-आलियासह सोनल चौहान आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आलिया-वरुण स्टारर हा सिनेमा 11 जुलै रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.