आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जल' सिनेमाची पटकथा कच्छ भोवती गुंफलेली आहे. सिनेमात कच्छमधील पाण्याच्या समस्यासोबतच तेथील ग्रामीण भागातील अडचणी आणि सांस्कृतिक वातावरण सादर करण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला आहे. सिनेमात बक्का (पूरब कोहली) एक असा ज्योतिषी आहे, जो पाण्याविषयीचे तर्क लावतो. गावातील दुष्काळ दुर करण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
एके दिवशी परदेशी पक्षी तज्ञ महिला राजहंसांना वाचवण्याच्या ध्येयाने कच्छला पोहोचते. बक्का तिला मदत करण्यासाठी पुढे येतो. तेथून बक्काच्या अडचणी आणि त्याच्या आयुष्याची परिक्षा अप्रत्यक्षरित्या वाढून लागतात. सिनेमात पाण्याच्या पाश्वभूमीसोबतच प्रेम नाते, शत्रुत्व, अत्याचार आणि मानवी चरित्र्य या सर्व मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी बुसान राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियासह विविध फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला आहे. या सिनेमाची विविध फिल्म महोत्सवमध्ये प्रशंसाही झालेली आहे.
सिनेमात पूरब कोहलीव्यतिरिक्त तनिष्ठा चटर्जी आणि किर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचे संगीत प्रसिध्द गायक सोनू निगम आणि तबला वादक विक्रम घोष यांनी दिले आहे. या जोडीने पहिल्यांदा बॉलिवूड सिनेमासाठी म्यूझिक कंपोझिंग केले आहे. पाश्वगायिका शुभा मुद्रलने सिनेमाचे शिर्षक गीत स्वरबध्द केले आहे.