आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कांची' हा सिनेमा सुभाष घई यांनी दिग्दर्शित केला असून हेच या सिनेमाचे निर्मातेसुद्धा आहेत. सुभाष घई यांनी यापूर्वी
‘कालीचरण’(1976), ‘विश्वात्मा’(1978), ‘कर्ज’(1980), ‘हीरो’(1983), ‘कर्मा’(1986), ‘राम लखन’(1989) आणि ‘खलनायक’(1993) या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.
2008मध्ये रिलीज झालेला 'युवराज' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा सिनेमा होता. तब्बल पाच वर्षांनी ते आता कांची हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
'कांची'मध्ये कार्तिक तिवारी आणि नवोदित अभिनेत्री मिष्टी घोष मेन लीडमध्ये आहेत. या दोघांशिवाय ऋषी कपूर, मिथून चक्रवर्ती यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. इस्माइल दरबार आणि सलीम-सुलेमान हे या सिनेमाचे संगीतकार आहेत. येत्या 25 एप्रिल रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.