आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न पहावे करुन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय नाईक दिग्दर्शित 'लग्न पहावे करुन' हा रोमँटिक धाटणीचा सिनेमा आहे. त्याच्या शीर्षकावरुनच हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल.
विवाह संस्थेला आपल्याकडे वेगळे पावित्र्य आहे! आजच्या तरुण पिढीची मानसिकता लक्षात घेता लग्न जुळवणे आणि टिकवणे, हे मोठे आव्हान आहे, कारण आजच्या धकाधकीच्या आणि ताण-तणावपूर्ण आयुष्यात एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे कठीण होत चालले आहे! या सगळ्याचा विचार करून दोन तरूण एक वधू-वर सूचक मंडळ सुरू करतात. पारंपरिक विवाह जुळवण्याच्या पद्धतीला ते आधुनिक विचारांची जोड देतात, जेणेकरून लग्न नुसतीच जुळवण्यापलिकडे जाऊन, लग्न टिकवण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींचा विचार केला जाईल! हे सर्व करत असताना त्यांची होणारी तारेवरची कसरत एका तरल अशा प्रेमकहाणीतून प्रेक्षकांना बघता येणारेय.
अदिती टिळक (मुक्ता बर्वे) आणि निशांत बर्वे (उमेश कामत) एक मॅरेज ब्युरो सुरु करतात. त्यांच्या मॅरेज ब्युरोचे नाव 'शुभविवाह' आहे. लव्ह मॅरेज नव्हे तर अरेंज मॅरेज जुळवून ते लग्न शेवटपर्यंत कसे टिकेल यावर त्यांचा भर असतो. यासाठी हे दोघेही 'सायंटिफिक मॅरेज मेकिंग' ही नवीन संकल्पना अमलात आणतात. पत्रिका बघून लग्न जुळवण्याचे ते ठरवतात. अदिती आणि निशांतच्या मॅरेज ब्युरोत जुळलेले पहिले लग्न म्हणजे राहुल आणि नंदिनीचे. मात्र राहुल आणि नंदिनीचे लग्न फार काळ टिकणार नाही, असे शहरातील एक प्रसिद्ध ज्योतिषी अदिती आणि निशांतला सांगतात. त्यामुळे राहुल आणि नंदिनीचे लग्न टिकवण्याचे मोठे चॅलेंज राहुल आणि अदितीसमोर उभे राहते. आता राहुल आणि नंदिनीचे लग्न टिकणार का ? अदिती आणि निशांत त्यांच्या उद्देश पूर्ण करु शकतील का ? हे या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे.