आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लय भारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टायटलवरूनच भन्नाट वाटणा-या 'लय भारी' या सिनेमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केलंय. झी टॉकीज प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती ‘सिनेमंत्रा प्रॉडक्शन’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली असून जितेंद्र ठाकरे, अमेय खोपकर आणि जेनेलिया देशमुख हे ‘लय भारी’ या सिनेमाचे निर्माते आहेत.
धमाल संगीत, कथानक आणि अभिनयाची दर्जेदार मिसळ असलेल्या या सिनेमात रितेश देशमुख सोबत तन्वी आझमी, राधिका आपटे, उदय टिकेकर, शरद केळकर, संजय खापरे आणि अदिती पोहनकर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी ‘लय भारी’ सिनेमाची कथा लिहिली असून पटकथा रितेश शहा यांनी तर संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. गीते गुरू ठाकूर आणि अजय-अतुल यांनी लिहिली आहेत. तर सिनेमटोग्राफी संजय मेमाने यांनी केलीये. संकलन आरिफ शेख यांनी तर कोरिओग्राफी गणेश आचार्य आणि राजू खान यांनी केलीये. बरेच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेला रितेश देशमुखचा हा पहिला मराठी सिनेमा आता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला असून येत्या 11 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रदर्शित होतोय.