आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटेरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'लुटेरा' या सिनेमाची कथा 1953 सालची दाखवण्यात आली आहे. एक पुरातत्वशास्त्रज्ञ वरुण श्रीवास्तव एका जमीन मालकाच्या मंदिराच्या जमीन उत्तखनन संबंधात पश्चिम बंगालमधील माणिकपूर या गावात येतो.
वरुण श्रीवास्तव (रणवीर सिंह) आपल्या ज्ञान, अनुभव आणि वर्तनाने जमीन मालक आणि त्याच्या कुटुंबीयांची मनं जिकंतो. जमीन मालकाची मुलगी पाखी (सोनाक्षी सिन्हा) नकळत त्याच्याकडे आकर्षित होते आणि त्याच्यावर एकतर्फी प्रेम करु लागते.
कालांतराने वरुणसुद्धा तिच्याप्रेमात पडतो. मात्र वरुणला त्याचा भूतकाळ किंवा पाखीपैकी एकाची निवड करण्याची वेळ येते. हा निर्णय घेण्यासाठी वरुण निघून जातो. पाखीसुद्धा वरुणला विसरुन आपले पूर्वीचे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. मात्र अचानक एकेदिवशी अशी काही परिस्थिती निर्माण होते की तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जातं.
नेमकं पाखीच्या आयुष्यात काय घडतं, वरुणचा भूतकाळ काय आहे, हे आपल्याला येत्या 5 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल.