आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्की कबूतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'लक्की कबूतर' हा एक रोमँटिक कॉमेडी धाटणीचा सिनेमा आहे. याचा ट्रेलर रिलीजच्या ब-याच दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. ट्रेलरची झलक पाहून या सिनेमात दिवअर्थी संवाद असल्याचे लक्षात येते.
या सिनेमात संजय मिश्रा, रवि किशन, एजाज खान मेन लीडमध्ये असून अभिनेत्री कुलराज रंधावा सिनेमातील मुख्य अभिनेत्री आहे. यापूर्वी कुलराज धर्मेंद्र, सनी आणि बॉबी स्टारर 'यमला पगला दिवाना' या सिनेमात झळकली होती.
लक्की कबूतर या सिनेमाचे म्युझिक लाँच नोव्हेंबर 2013 मध्ये करण्यात आले होते. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा या सिनेमाची संगीतकार आहे.
सिनेमाची कथा लक्कीची भूमिका साकारणा-या एजाजभोवती गुंफण्यात आली आहे. एजाज एक विवाहित आणि सेटल व्यक्ति आहे. मात्र एकेदिवशी अचानक त्याच्यासमोर त्याच्या पत्नीचा भूतकाळ उघड होतो, त्यानंतर सिनेमात ट्विस्ट येतो.
शम्मी छब्बर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे, तर करण राज निर्माते आहेत. 18 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.